Type Here to Get Search Results !

22 December In History : शिखांचे 10 वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म, भारतात पहिली मालगाडी धावली; आज इतिहासात

22 December In History : 22 डिसेंबरचा दिवस इतिहासात अनेक मोठ्या घटनांनी नोंदवला गेला आहे. आजच्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबर 1666 रोजी शिखांचे 10 वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म  22 डिसेंबर 166 रोजी पटना येथे झाला. याबरोबरच भारतात पहिली मालगाडी धावली. ही गाडी उत्तराखंडच्या रुरकी येथून चालवली जात होती.   इंजिनला आग लागल्यानंतर ही लाइन बंद झाल्यानंतर ही गाडी 9 महिने कार्यरत राहिली. याबरोबरच भारतीय क्रिकेटपटू वसंत रांजणे यांचे 22 डिसेंबर 2011 रोजी निधन झाले.

1666 : शिखांचे 10 वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म

शिखांचे 10 वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म  22 डिसेंबर 166 रोजी पटना येथे झाला. गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरू होते. गुरू गोविंद सिंग यांनी शीख धर्मासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 1699 मध्ये त्यांनी खालसा या शीख योद्धा समुदायाची स्थापना केली. त्यांनी महत्त्वाचे ग्रंथही लिहिले आणि शीख धर्माच्या पाच क्षांचा परिचय करून दिला.

1851 : भारतात पहिली मालगाडी धावली

भारतात पहिली मालगाडी धावली. ही गाडी उत्तराखंडच्या रुरकी येथून चालवली जात होती.   इंजिनला आग लागल्यानंतर ही लाइन बंद झाल्यानंतर ही गाडी 9 महिने कार्यरत राहिली. थॉमसन वरून जेन्नी लिंडमध्ये पहिल्या इंजिनचे नाव बदलले गेले.

1910 : अमेरिकेत प्रथमच पोस्टल बचत पेपर जारी करण्यात आला

अमेरिकेत आज्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबर 1910 रोजी प्रथमच पोस्टल बचत पेपर जारी करण्यात आला.

1940 : एम नाथ राय यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीच्या स्थापनेची घोषणा केली

एम. नाथ. राय यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीच्या स्थापनेची घोषणा 22 डिसेंबर 1940 रोजी केली. राय यांचे पूर्ण नाव मानवेंद्र नाथ राय असे होते. दुसऱ्या महायुद्धकाळात या पक्षाने लोकविरोधकाला न जुमानता युद्धसहकार्याचे धोरण स्वीकारले आणि त्याप्रमाणे काम केले. युद्धसहकार्य हे साधाऱणपणे लोकांनाही पसंत नव्हते आणि म्हणून युद्धकाळात रॉय यांची लोकप्रियता बरीच खालावली. वर्तमानपत्रांतून त्यांच्याविरुद्ध प्रचार झाला, त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध काही ठिकाणी दगडफेक, चिखलफेकदेखील झाली. या सर्व प्रकारांमुळे विचलित न होता रॉय यांनी आपले निश्चित केलेले धोरण तसेच चालू ठेवले.

1971 : सोव्हिएत युनियनने भूमिगत अणुचाचण्या केल्या

तात्कालीन सोव्हिएत युनियनने भूमिगत अणुचाचण्या केल्या. हा विवस 22 डिसेंबर 1922 हा होता. सोव्हिएत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हिएत संघाची स्थापना 30 डिसेंबर1922 रोजी झाली आणि 26 डिसेंबर 1991 रोजी त्याचे 15 देशांमध्ये विघटन झाले. सोव्हिएत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. या देशाने आशिया खंडाचा एक तृतीयअंश  भाग आणि युरोप खंडाचा एकदृतीय अंश भाग व्यापला होता. या देशाच्या सीमा पूर्वेला पॅसिफिक महासागरापर्यंत, पश्चिमेला पोलंड आणि बाल्टिक समुद्रापर्यंत, उत्तरेला आर्क्टिक महासागरापर्यंत आणि दक्षिणेला काळा समुद्र, इराण, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या उत्तर सीमांपर्यंत होत्या.

1972 : निकारागुआची राजधानी मॅनाग्वा येथील भूकंपात 12 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू

निकारागुआची राजधानी मॅनाग्वा येथे 6.25 तीव्रतेच्या भूकंपात 12 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हा भूकंप 22 डिसेंबर 1972 रोजी झाला होता.

1988 :  पॅन अॅमचे जंबो जेट क्रॅश

स्कॉटिश सीमेजवळील लॉकरबी शहरात  पॅन अॅमचे जंबो जेट क्रॅश झाले. यात  258 लोकांचा मृत्यू झाला होता.

1989 : रोमानियामध्ये निकोले सेउसेस्कूची हुकूमशाही राजवट संपली

रोमानियामध्ये 24 वर्षांनंतर निकोले सेउसेस्कूची हुकूमशाही राजवट संपली आणि देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याला अटक करण्यात आली.

1990 : क्रोएशियाने संविधान स्वीकारले

क्रोएशियाने 22 डिसेंबर 1990 रोजी संविधान स्वीकारले. त्यानंतर या देशाने आपल्या नागरिकांना व्यापक अधिकार दिले. एप्रिल 1990 मध्ये झालेल्या पहिल्या बहुपक्षीय संसदीय निवडणुकांनंतर संसदेने विविध घटनात्मक बदल केले.  22 डिसेंबर 1990 रोजी त्यांनी कम्युनिस्ट एक-पक्षीय प्रणाली नाकारली आणि क्रोएशियाचे प्रजासत्ताक म्हणून क्रोएशियाचे उदारमतवादी-लोकशाही संविधान स्वीकारले.

2001 : ब्रिटीश इस्लामिक कट्टरपंथी रिचर्ड रीड याने विमानाच स्फोट घडवून आण्याचा प्रयत्न केला.

ब्रिटीश इस्लामिक कट्टरपंथी रिचर्ड रीड याने शूजमध्ये लपवलेल्या स्फोटकांनी विमानात स्फोट घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. विमानात सुमारे 200 लोक होते. विमानातील सहप्रवाशांनी रीड याचा प्रयत्न हाणून पाडला. नंतर अमेरिकेतील न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

2010 : राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची समलैंगिकांशी संबंधित कायद्यावर स्वाक्षरी

2010 मध्ये या दिवशी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एक कायदा मंजूर केला आणि सैन्यात समलैंगिकांच्या सेवांना कायदेशीर मान्यता दिली. याआधी 1993 मध्ये लागू करण्यात आलेल्या एका कायद्याने समलिंगी सैनिकांना त्यांची लैंगिकता लपविण्यास भाग पाडले होते.

2011  : भारतीय क्रिकेटपटू वसंत रांजणे यांचे निधन

वसंत रांजणे यांचा जन्म पुण्यात 22 जुलै 1937 रोजी झाला. वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजीला खेळपट्ट्या अनुकूल असण्याच्या काळात त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून ते 1958 ते 64 दरम्यान सात कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी 34.15 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध कानपूर येथे 12 डिसेंबर 1958 मध्ये त्यांनी कसोटीत पदार्पण केले. शेवटचा कसोटी सामना ते 1964 मध्ये चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या अव्वल खेळाडूंविरुद्ध त्यांनी अचूक गोलंदाजी केली. प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी महाराष्ट्र आणि रेल्वेकडून खेळताना आपला दबदबा राखला. 22 डिसेंबर 2011 रोजी त्यांचे निधन झाले.

from india https://ift.tt/jt6LfCh
https://ift.tt/I3ajrGK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.