Export Promotion Councils in India: कापड उद्योगांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कापसाची उपलब्धता सुनिश्चित करावी. याशिवाय कापूस उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्वांनी योग्य कापसाच्या उपलब्धतेचा शोध आणि कापूस उत्पादनांची चांगली किंमत सुनिश्चित करण्यासाठी, धोरणावर चर्चा करण्याकरता एकत्र यायला हवे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल (Union Textiles Minister Piyush Goyal) म्हणाले आहेत. त्यांनी बुधवारी निर्यात संवर्धन परिषदेच्या (Export Promotion Councils) सदस्यांबरोबर व्हर्चुअल माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत सर्व 11 निर्यात संवर्धन परिषदेच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत व्हर्चुअल माध्यमातून बैठक बोलावली होती.

वस्त्रोद्योग क्षेत्राला (textile sector) बळकटी देण्यासाठी नवीन कल्पनांवर चर्चा करण्याकरिता दोन दिवसीय बैठक आयोजित करावी, असे गोयल म्हणाले. यात सहभागींपैकी किमान 50% तरुण असावेत. सर्वसमावेशकतेसाठी भारतीय गुणवत्ता नियंत्रण (क्यूसीआय), वाणिज्य, डीपीआयआयटी, वित्त, बँकिंग निर्यात विमा यांचाही सहभाग असावा, जेणेकरून सर्वांगीण विषयांवर चर्चा करता येईल, असे ते (Union Textiles Minister Piyush Goyal) म्हणाले.

गेल्या वर्षी कापड निर्यात जवळपास 42 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती तर येत्या 5-6 वर्षात 100 अब्ज अमेरीकी डॉलर्सचे लक्ष गाठायचे आहे. हे साध्य केले तर या क्षेत्राचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे एकत्रित आर्थिक मूल्य 250 अब्ज डॉलर्स होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2022-23 पीक हंगामात कापूस उत्पादन (Cotton production during crop season) 3.41 कोटी गाठी असल्याचा अंदाज आहे. जे एक वर्षापूर्वी 31.12 कोटी गाठी होते. एका गाठीचे वजन 170 किलो असते. खरीप हंगामात कापसाची पेरणी झाली असून ऑक्टोबरपासून काढणीला सुरुवात झाली आहे. मंत्री गोयल म्हणाले (Union Textiles Minister Piyush Goyal) की, वस्त्रोद्योग अभियानाअंतर्गत निधी उपलब्ध असून तो नव्या प्रकल्पांसाठी उपयोगात आणला पाहिजे. जी-20 मध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राची क्षमता दर्शवता येईल. अर्थमंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या खरेदी महोत्सवात उद्योग प्रतिनिधींचा सहभाग वाढवता येईल, असे त्यांनी सांगितले.

इतर महत्वाची बातमी:

फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला, 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प वडोदऱ्यात, 30 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते उद्धाटन

from india https://ift.tt/1lhgXY2
https://ift.tt/9PE8ziL
Textiles Export: वस्त्रोद्योग क्षेत्रापुढे येत्या 5-6 वर्षात 100 अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
October 27, 2022
0