Morbi Cable Bridge Collapses: गुजरातमधील मोरबीत रविवारी झुलता पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकांचं आतापर्यंत बचावकार्य सुरू आहेय विशेष म्हणजे हा पूल चार दिवसांपूर्वीच दुरुस्त केला होता आणि त्यानंतर आता सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी झाली आणि पूल कोसळला. गुजरातमध्ये दुर्घटनेपूर्वी पुलावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे.

माच्छू नदीवर बनवण्यात आलेला हा झुलता पाच दिवसांपूर्वीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. सध्यांकाळी 7 च्या सुमारास ह दुर्घटना घडली. दुर्घटना घडली त्यावेळी 500 हून अधिक नागरिक उपस्थित होते. सर्व जण छट पूजा (Chhath) साजरी करण्यासाठी आले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा सहभाग अधिक होता. य दुर्घटनेत 400 हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती आता वर्तवलीय जात आहे. तर आतापर्यंत 170 हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.

वायुसेनेच्या जवानांना बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच गुजरात सरकारने मदतीसाठी 02822-243300 हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. मोरबी येथील स्थानिक आमदार बृजेश मेरजा म्हणाले, आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे.

#WATCH | Several people feared to be injured after a cable bridge collapsed in the Machchhu river in Gujarat's Morbi area today

PM Modi has sought urgent mobilisation of teams for rescue ops, while Gujarat CM Patel has given instructions to arrange immediate treatment of injured pic.twitter.com/VO8cvJk9TI
— ANI (@ANI) October 30, 2022

दुर्घटनेनंतर नौदलाच्या 50 कर्मचाऱ्यांसह NDRF, हवाई दलाच्या जवानांना रेस्क्यू ऑपरेशनकरता पाठवण्यात आले आहे. तसेच राजकोट सिव्हिल रुग्णलयात एक आयसोलेशन वॉर्ड बनवण्यात आला आहे. मोरबी येथील हा झुलता पुल हा महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय सुरू करण्यात आला आहे. पैसे कमवण्याच्या हेतूने हा पूल सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. या पूलावर जाण्यसाठी नागरिकांना 17 रुपये तर लहान मुलांना 12 रुपये तिकिट आकारण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाना पीएमएनआरएफ (PMNRF) निधीतून दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरतचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

from india https://ift.tt/fBoOAGq
https://ift.tt/GZIgn89
Morbi Cable Bridge Collapses: मोरबी पूल दुर्घनेत 84 जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
October 30, 2022
0