मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थांपैकी एक असलेल्या दूरदर्शनवरून पहिले प्रसारण. तसेच 'परिणीता' या गाजलेल्या कादंबरीचे लेखक शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. 15 सप्टेंबर हा दिवस इतिहासात महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

जाणून घेऊया इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं,

1860 : भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांची जयंती.

देशाचे इंजिनीअर आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्र्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा जन्मदिन हा अभियंता दिन म्हणजेच इंजिनीअर्स डे म्हणून साजरा केला जातो. नदीवरचे बंधारे, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना तयार करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

1876 : प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा आज जन्मदिन

प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा आज जन्मदिन आहे. 'परिणीता' ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे.

1959 : दूरदर्शनवरून पहिले प्रसारण

दूरदर्शनवरून 15 सप्टेंबर 1959 मध्ये दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. शैक्षणिक आणि विकासात्मक विषयांवर आधारित एक तासाचा हा कार्यक्रम होता. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. सुरुवातीला युनेस्कोच्या मदतीने दूरदर्शन आठवड्यातून दोनदा फक्त एक तासाचा कार्यक्रम प्रसारित करत असे. नागरिकांना जागरूक करणे हा त्यांचा उद्देश होता.

2012 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन झाले. 2000 ते 2009 या कालावधीत के. एस. सुदर्शन सरसंघचालक होते. 2009 साली त्यांनी स्वेच्छेने सरसंघचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.

from india https://ift.tt/W3xHu4a
https://ift.tt/eTCoVN0
दूरदर्शनवरून पहिले प्रसारण अन् अभियंता दिन, जाणून घ्या 15 सप्टेंबरला इतिहासात काय घडलं
September 14, 2022
0