Type Here to Get Search Results !
Narendra Modi : नरेंद्र मोदी हेच 'विश्वगुरू'; 75 टक्के रेटिंग मिळवून लोकप्रियतेत 'जगात भारी'
मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे केवळ भारतातच लोकप्रिय नसून जगभरात सर्वात लोकप्रिय (Most Popular World Leader) असल्याचं स्पष्ट झालं आहे. नरेंद्र मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगभरातल्या नेत्यांना मागं टाकलं आहे. ग्लोबल रेटिंगमध्ये 75 टक्के पसंती मिळवून त्यांनी यामध्ये सर्वात वरचा क्रमांक पटकावला आहे. मॉर्निंग कन्सल्ट (Morning Consult Survey) या संस्थेने केलेल्या एका सर्व्हेमधून ही गोष्ट समोर आली आहे. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (US president Joe Biden) 41 टक्के पसंतीसह पाचव्या क्रमांकावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत 75 टक्के पसंतीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर मेक्सिकोच्या पंतप्रधान अन्ड्रेस मॅन्यूएल लोपेज ओब्राडॉर (Andres Manuel Lopez Obrador-63 टक्के) यांचा क्रमांक लागत असून तिसऱ्या क्रमांकावर इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी (Mario Draghi -54 टक्के) यांचा क्रमांक लागतोय. मॉर्निंग कन्सल्टने या जगभरातल्या 22 नेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. ब्राझिलचे अध्यक्ष बोल्सोनारो हे 42 टक्के पसंतीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
ज्यो बायडेन यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो ( Justin Trudeau) हे 39 टक्के पसंतीसह सहाव्या क्रमांकावर तर जपानचे पंतप्रधान फुमीओ किशिदा (Fumio Kishida) हे 38 टक्के पसंतीसह सातव्या क्रमांकावर आहेत.
या आधीही जानेवारी 2022 आणि नोव्हेंबर 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते.
Global Leader Approval: *Among all adults
Modi: 75%
López Obrador: 63%
Draghi: 54%
Bolsonaro: 42%
Biden: 41%
Trudeau: 39%
Kishida: 38%
Macron: 34%
Scholz: 30%
Johnson: 25%
*Updated 08/25/22 pic.twitter.com/akVltXdfQk
— Morning Consult (@MorningConsult) August 26, 2022
मॉर्निंग कन्सल्ट (Morning Consult Survey) या संस्थेकडून राजकीय निवडणुका, निवडून आलेले नेते आणि मतदान या मुद्द्यांवर रिअल टाईम डेटा पुरवला जातोय. या संस्थेकडून दररोज जवळपास 20 हजार लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. हा सर्व्हे सात दिवसांपर्यंत सुरू होता. या सर्व्हेमध्ये एकट्या अमेरिकेतून 45 हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे. तर भारतासह इतर सर्व देशांमध्ये 500 ते 5000 लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे. या डेटामधून समोर आलेल्या माहितीमध्ये 1 ते 4 टक्क्यांचं अंतर असू शकतं असं या संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.
from india https://ift.tt/6OgryRx
https://ift.tt/ZRXobTH
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.