<p>काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडताच काँग्रेसमध्ये भूकंप आला आहे. आझाद यांनी पक्ष सोडताच जम्मू-काश्मीरमधून काँग्रेसच्या 64 नेत्यांनी मंगळवारी एकत्र पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ज्या 64 नेत्यांनी राजीनामा दिला त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वाणी, घारू चौधरी, मनोहरलाल शर्मा, बलवान सिंग, जम्मू-काश्मीर काँग्रेस सचिव नरिंदर शर्मा आणि महासचिव गौरव मगोत्रा यांचा समावेश आहे. हे सगळे नेते रविवारी आझाद यांच्या नेतृत्वात नवीन पक्षात प्रवेश करतील. आझाद यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.</p>
from india https://ift.tt/IVPdqWj
https://ift.tt/VSXEjm8
Ghulam Nabi Azad यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये भूकंप; जम्मूत 64 नेत्यांचा राजीनामा
August 30, 2022
0