Type Here to Get Search Results !

Rubaiya Sayeed Case : 'हाच तो यासीन मलिक', CBI कोर्टात रुब्या सईदने अपहरणकर्त्याला ओळखलं, 33 वर्षांपूर्वीचं प्रकरण

Rubaiya Sayeed Case Latest Update: देशाचे माजी गृहमंत्री आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुब्या सईद यांचे 8 डिसेंबर 1989 रोजी अपहरण करण्यात आले होते. मात्र नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. 1989 च्या अपहरण प्रकरणात पीडीपी पक्षच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांची बहीण रुब्या सईद पहिल्यांदाच सीबीआय न्यायालयात हजर झाल्या. त्यांनी न्यायाधीशांसमोर आपले म्हणणे नोंदवले, तसेच आरोपी यासीन मलिकची ओळख पटवली. या प्रकरणी सीबीआयच्या वकील मोनिका कोहली यांनी सांगितले की, रुब्या यांनी एकूण 4 आरोपींना ओळखले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.

रुब्या सईद यांचे वकील अनिल सेठी यांनी सांगितले की, त्यांना पुढील सुनावणीसाठी पुन्हा येण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी न्यायालयात बोलताना यासीन मलिक म्हणाला की, त्याला वैयक्तिकरित्या जम्मूला उलटतपासणीसाठी आणावे. मात्र त्याला जम्मूमध्ये आणले जाणार की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासीन मलिकशिवाय अली मोहम्मद मीर, मोहम्मद जमान मीर, इक्बाल अहमद, जावेद अहमद मीर, मोहम्मद रफीक, मंजूर अहमद सोफी, वजाहत बशीर, मेहराज-उद-दीन शेख आणि शौकत अहमद बक्षी हे देखील या प्रकरणात आरोपी आहेत.

काय आहे प्रकरण?

जम्मू-काश्मीरमध्ये 90 च्या दशकात दहशतवादाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्याचवेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे रुब्या सईद यांचे अपहरण झाले होते. मुफ्ती मोहम्मद सईद हे जम्मू-काश्मीरचे मोठे नेते होते आणि नंतर ते मुख्यमंत्रीही झाले. मुफ्ती मोहम्मद सईद 1989 मध्ये देशाचे गृहमंत्री असताना त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. रुब्या सईद यांच्या सुटकेसाठी सरकारने 5 दहशतवाद्यांची सुटका केली होती. या संपूर्ण घटनेत जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याचा हात होता, असा आरोप आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/jXDxiBO Election 2022 : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकीला आठवडाभरात तिसरा धक्का!
<a href="https://ift.tt/RmiLNT1 Ranking 2022: NIRF कडून भारतातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचे मानांकन घोषीत, महाराष्ट्राचे नाव नाही, आश्चर्याची बाब समोर
<a href="https://ift.tt/VtvcWYf Guidelines : देशात मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क, आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

from india https://ift.tt/V9PRkrf
https://ift.tt/NuWKgb5

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.