People Leave Indian Citizenship: भारतीय नागरिकांबद्दल (Indian Citizenship) एक आश्चर्यकारक माहिती समोर आली असून गेल्या वर्षात तब्बल 1 लाख 63 हजार 370 भारतीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत विचारलेल्या एका लिखित प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली आहे. भारतीय नागरिकत्वाचा त्याग आणि त्याचा स्विकार करणाऱ्या नागरिकांची आकडेवारी आज केंद्र सरकारने संसदेत सादर केली

दरम्यान 2019 साली ही संख्या 1 लाख 44 हजार 17 इतकी होती. 2019 साली नागरिकत्व सोडलेल्या भारतीयांपैकी एकाही भारतीयाने पाकिस्ताने नागरिकत्व स्विकारले नाही. मात्र यावर्षी मात्र 41 भारतीयांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्विकारले. तर 2020 साली ही संख्या सात इतकी होती. सरकारने दिलेल्या उत्तरेत म्हटले आहे की, सर्व नागरिकांनी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे भारताचे नागरिकत्व सोडले आहे.

भारताचे नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक कल आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पसंती आहे. तिसऱ्या क्रमांकावर कॅनडा हा देश आहे. तर चौथ्या क्रमांकावर ब्रिटन या देशाला पसंती आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 साली 61,683 नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडून अमेरिकेची स्विकारले. तर 2020 साली ही संख्या 30,828 होती. तर 2021 साली ही संख्या 71,284 वर पोहचली आहे. अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियाला पसंती आहे. 2019 साली 21,340 नागरिकांनी ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले. 2020 साली हा आकडा 13,518 एवढा होता. तर 2021 साली वाढ झाली असून 23,533 नागरिक स्थायिक झाले.

संबंधित बातम्या :

<a href="https://ift.tt/gomcLx4 Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; महागाईविरोधात संसदेच्या प्रांगणात काँग्रेस करणार आंदोलन

<a class="topic_text" title="Parliament Session : सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान गैरहजर, काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित" href="https://ift.tt/VbFJP2m Session : सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान गैरहजर, काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

<a class="topic_text" title="parliament session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता, महागाईच्या मुद्यावर चर्चा नाहीच" href="https://ift.tt/fURPlEQ session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता, महागाईच्या मुद्यावर चर्चा नाहीच

from india https://ift.tt/HeR7Myq
https://ift.tt/FGUB9yj
People Leave Indian Citizenship : वर्षभरात एक लाखांहून अधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडलं, सरकारची संसदेत माहिती
July 19, 2022
0