Type Here to Get Search Results !

Railway Ticket Booking: रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता लगेच होईल तिकीट बुक

IRCTC Ticket Booking Rules: तुम्ही नेहमीच ट्रेनने प्रवास करत असाल आणि त्यासाठी IRCTC द्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. आता तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी काही सेकंदच लागणार आहेत. चला तर जाणून घेऊ रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये काय बदल केले आहेत.

कोरोना संकट सुरू झाल्यानंतर रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुक करताना Destination Address भरणे आवश्यक केले होते. याद्वारे कोरोना प्रकरणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सहज केले जात होते. पण आता कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे, IRCTC ने लोकांच्या सोयीसाठी पत्ता भरण्याचा पर्याय काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

IRCTC सॉफ्टवेअरमध्ये केले बदल

लोकांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बुकिंग करताना प्रवाशांना पत्ता भरण्यासाठी दोन ते तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत होता. आता तो वेळ वाचणार असून ऑनलाइन तिकीट बुकिंग लवकरच होणार आहे. या बदलासाठी CRIS आणि IRCTC ने सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहेत. यानंतर तुम्हाला आता तिकीट बुकिंग करताना तुमचा पत्ता भरण्याची गरज राहणार नाही.

रेल्वेने बेडरोल सुविधाही केली सुरू

विशेष म्हणजे मार्च महिन्यात रेल्वेने उशी ब्लँकेट देण्याची सुविधाही सुरू केली होती. कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर रेल्वेकडून बेडरोल सुविधा सुरू करण्यात आली आहे. ती आता प्रत्येक ट्रेनमध्ये सुरू करण्यात आली आहे. बेडरोलच्या सोयीसाठी रेल्वेने टप्प्याटप्प्याने बेडरोलची सुविधा सुरू केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/FbtCrz7 Bonds : भाजपच्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये प्रचंड घसरण, इलेक्शन फंडही 3623 कोटींवरून 752 कोटींवर
<a href="https://ift.tt/TRchYe0 Violence : कानपूर हिंसाचार प्रकरण, 18 जण अटकेत, योगींच्या कार्यकाळात आतापर्यंत किती हिंसाचाराच्या घटना घडल्या?
'तुम्ही माझ्यावर अन्याय केला...', राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

from india https://ift.tt/pB9mkXf
https://ift.tt/uLUz4W8

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.