Type Here to Get Search Results !

Gujarat: माजी केंद्रीय मंत्री दुसऱ्याच मुलीसोबत, पत्नीने टाकली धाड अन् दोघांनाही धू धू धुतलं

गांधीनगर: माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भरत सिंह सोळंखी एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. भरत सिंह सोळंखी दुसऱ्याच एका मुलीसोबत असताना त्यांच्या पत्नीने त्यांना गाठलं आणि त्या मुलीचा चांगलंच धुतलं. रेश्मा पटेल असं सोळंखी यांच्या पत्नीचं नाव असून त्यांनी या प्रसंगाचा एक व्हिडीओही काढला होता. आता हो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भरत सिंह सोळंखी आणि त्यांची पत्नी रेश्मा पटेल यांच्यामध्ये वाद सुरू असून तो वाद कोर्टात पोहोचला आहे.

पत्नीने पाठलाग केला आणि....
ती मुलगी सोळंखी यांच्यासोबत राहत होती. रेश्मा यांनी या दोघांना आईस्क्रीम खाताना पाहिलं आणि त्यांचा पाठलाग केला. ज्या बंगल्यात हे दोघे राहत होते तिथे पोहचल्या. मग रेश्मा पटेल यांनी आपल्या नवऱ्याचीच धुलाई केली आणि मग तिचा मोर्चा वळला तो त्या मुलीकडे. रेश्मा यांनी त्या मुलीला चांगलंच बदडून काढलं. रेश्मा पटेल यांचा हा रुद्रावतार त्यांच्या पाठीराख्यांनी मोबाईलमध्ये कैद केला आणि क्षणार्धात व्हायरल केला.

काय म्हणाल्या रेश्मा पटेल?
या प्रकरणी रेश्मा पटेल म्हणतात की, मी माझ्या नवऱ्याला परस्त्रीपासून दूर रहायला सांगितलं. आपण घरी जाऊ, पुन्हा संसार सुरु करु. आपल्यात जे भाडंण सुरु आहे त्याबद्दल आपण घरी बोलू, कॉम्प्रमाईज करु. आपलं जीवन नव्याने सुरु करु. मला सांगा अशी अय्याशी कोणती स्त्री सहन करेल?

रेश्मा पटेल म्हणल्या की, सध्या माझ्याकडे खाण्याचेही पैसे नाहीत. कोर्टाकडे मी विनंती केलीय की मला मदत मिळावी. या मुलीकडे मात्र हा बंगला आहे. तिची ऐपत नसताना हा बंगला ती कशी विकत घेऊ शकते? गाडी सुद्धा आहे तिच्याकडे. मी अनेक वेळा काँग्रेसच्या वरिष्ठांना सांगितलं, माझ्या नवऱ्याला समजवा, तुमच्या पार्टीचंच नुकसान होईल. मात्र कॉंग्रेस पक्षाच्या कोणत्याच नेत्याने मदत केली नाही.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यामुळे बदनाम झालेले काँग्रेस नेते भरत सिंह सोळंखी यांनी आता थेट राजकारणालाच रामराम केलं आहे.

from india https://ift.tt/sOb0ESC
https://ift.tt/VgHdvsr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.