Type Here to Get Search Results !

Delhi Building Collapsed: दिल्लीतील पहाडगंज परिसरात इमारत कोसळली, साडेतीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Delhi News: दिल्लीतील पहाडगंज भागात एक इमारत कोसळली असून या घटनेत साडेतीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती देताना दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले की, पहाडगंज भागातील खन्ना मार्केट आणि विवेक हॉटेलजवळ रात्री 8:40 वाजता घर कोसळल्याची माहिती मिळाली. कोसळलेल्या वास्तूतून आतापर्यंत साडेतीन वर्षांचा बालक, दोन मुली आणि त्यांचे वडील बचावले आहेत. यातील बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले, ज्याचा नंतर मृत्यू झाला.

या घटनेतील मृत मुलाचे नाव अमजद असल्याचे सांगण्यात येत आहे. बचावण्यात करण्यात आलेल्या दोन मुलींपैकी जरीना दीड वर्षांची तर अलिफा आठ वर्षांची आहे. 52 वर्षीय मोहम्मद झहीरलाही बचावण्यात आले आहे. या सर्वाना दिल्लीतील कलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. विभागीय वॉर्डन पहाडगंज सुरेश मलिक यांनी सांगितले की, आम्ही बचाव कार्य करणाऱ्या एजन्सींना मदत करत आहोत. त्यांनी सांगितले की, आम्हाला घटनेची माहिती मिळताच आम्ही आमच्या स्वयंसेवकांसह घटनास्थळी पोहोचलो आणि बचाव कार्य सुरू केले. आम्ही रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची मदत घेत आहोत. आत ढिगाऱ्या खाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत.

यापूर्वी एप्रिलमध्ये दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये इमारत कोसळली होती. या अपघातातील ढिगाऱ्यातून सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सुमारे 1 महिन्यापासून घरात नूतनीकरणाचे काम सुरू होते. फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील जेजे कॉलनीत एक इमारत कोसळली होती. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता.

इतर महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/x7vsXoI Modi Gujarat Visit : पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर, विविध विकासकामांचे होणार उद्घाटन
<a href="https://ift.tt/1qh5kGv Gandhi : देशातील युवकांच्या संयमाची 'अग्निपरीक्षा' पाहू नका; अग्निपथ योजनेवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
<a href="https://ift.tt/An3ars9 On Sharad Pawar: असे राष्ट्रपती असल्यास देशात दहशतवाद वाढेल, भाजप नेते दिलीप घोष यांची शरद पवारांवर टीका

from india https://ift.tt/JX0UM31
https://ift.tt/oC8E9zX

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.