Type Here to Get Search Results !

पर्यावरणासाठी नव्या अभियानाची पंतप्रधान मोदी करणार सुरुवात, बिल गेट्सही होणार सहभागी

World Environment Day 2022 : जागतिक पर्यावरण दिनाचे (World Environment Day) औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 6 वाजता पर्यावरणासाठी जीवनशैली (Lifestyle for the Environment Life)  या जागतिक पुढाकाराची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरूवात करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जीवनशैली जगभरातील व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांनी स्वीकारावे, यासाठी प्रभावी आणि पाठपुरावा कसा करायचा, यासंदर्भात शिक्षणतज्ञ, विद्यापीठे आणि संशोधन संस्था आदींकडून नवनवीन कल्पना आणि सूचना मागवण्यासाठी 'लाईफ ग्लोबल कॉल फॉर पेपर्स' या उपक्रमाने सुरूवात होणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांचे मुख्य भाषणही होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे.

या कार्यक्रमात बिल अँड मेलिंडा गेट्स प्रतिष्ठानचे सहअध्यक्ष बिल गेट्स, हवामान अर्थशास्त्रज्ञ निकोलस स्टर्न, नज थिअरीचे लेखक प्राध्यापक कॅस सस्टेन, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष अनिरूद्ध दासगुप्ता; यूएनईपीच्या जागतिक प्रमुख श्रीमती इंगर अँडरसन, यूएनडीपीचे जागतिक प्रमुख अचिम स्टेनर आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हीड मॅलपास यांचा सहभागही रहाणार आहे.

ग्लासगो येथे गेल्या वर्षी झालेल्या 26 व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलविषयक परिषदेत(सीओपी26) पंतप्रधानांनी 'लाईफ ग्लोबल कॉल फॉर पेपर्स'ची कल्पना मांडली होती. अविचारी आणि विनाशकारी उपभोगाऐवजी विचारी आणि जाणीवपूर्वक उपयोगाला या कल्पनेवर भर देणारी पर्यावरणविषयक जागृत जीवनचक्राला ही कल्पना चालना देते.

जागतिक पर्यावरण दिनाचा इतिहास (World Environment Day 2022 History) :
जागतिक पर्यावरण दिनाचा उगम 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेत झाला. ही परिषद 5 जूनपासून सुरू झाली आणि 16 जूनपर्यंत चालली. तेव्हापासून जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा करण्यात येतो. पर्यावरणामुळेच आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे. लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

from india https://ift.tt/Gd2qsSx
https://ift.tt/uLUz4W8

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.