Type Here to Get Search Results !

UGC : चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप अनिवार्य; रिसर्च इंटर्नशिप गाईडलाईन्सला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली: आता चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप अनिवार्य असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नव्या रिसर्च इंटर्नशिप गाईडलाइन्सला मंजुरी दिली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली होती आणि त्यानंतर याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये इंटर्नशिप करणे अनिवार्य असणार आहे. विशेष करून चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप अनिवार्य केली जाणार आहे. स्किल लर्निंगवर जोर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील विस्तृत गाईडलाईन्स लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.

नव्या गाईडलाइन्समध्ये इंटर्नशिपचा कार्यकाल त्यासोबतच क्रेडिट बद्दल सुद्धा माहिती दिली जाईल. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिट असल्यामुळे याचासुद्धा विचार यामध्ये केला गेला आहे. एक वर्षानंतर अभ्यासक्रम सोडल्यास विद्यार्थ्याला सर्टिफिकेट मिळेल. ज्यामध्ये आठ ते दहा आठवड्याची इंटर्नशिप जरुरी असणार आहे. सातव्या सेमिस्टरला म्हणजे चौथ्या वर्षी दहा आठवड्यांची इंटर्नशिप अनिवार्य असेल.

या इंटर्नशिप मिळवण्यासाठी विद्यार्थी स्वतःहून रिसर्च इंटरंशिपसाठी अर्ज करतील किंवा त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून इंटर्नशिप मिळवतील. यासाठी एक ऑनलाइन पोर्टल तयार केले जाणार आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थी रिसर्च इंटरंशिपसाठी आपले रजिस्ट्रेशन करू शकतील.

UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा, UGC NET 2022 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA कडून एक महत्वाची माहिती देखील जारी करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत डिसेंबर 2021 आणि जून 2022 फेज परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज 30 एप्रिल 2022 पासून सुरू करण्यात आले आहेत. उमेदवार 20 मे 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. सविस्तर जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/IudFqQ4 on Pakistan Degree : पाकिस्तानमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात मिळणार नाही रोजगार, UGC चा निर्णय

​NEET PG 2022 : नीट पीजी परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच होणार जारी; डाऊनलोड कुठून कराल?

<a href="https://ift.tt/SXfqTta SSC Result 2022 10 जूनपर्यंत बारावीचा तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार : बोर्ड

from india https://ift.tt/wYQtbKC
https://ift.tt/KXnL2Fr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.