Type Here to Get Search Results !

Rainfall in Monsoon : या पावसाळ्यात पाऊस कमी होणार की जास्त? हवामान खात्याने सांगितला अंदाज

Rainfall in Monsoon : देशात या मान्सून हंगामात आधीच्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी ही माहिती दिली. जास्त पाऊस होणार असल्यामुळे मुबलक कृषी उत्पादन होईल आणि त्यामुळे महागाई कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, "या मान्सून हंगामातील सरासरी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 103 टक्के असण्याची शक्यता आहे." IMD ने एप्रिलमध्ये सांगितले होते की देशात सामान्य पाऊस पडेल जो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 99 टक्के असेल.

महापात्रा म्हणाले की, गुजरात ते ओडिशा पर्यंतची राज्ये शेतीसाठी पावसावर अवलंबून आहेत. दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 106 टक्क्यांपेक्षा जास्त सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम भागात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. सलग चौथ्या वर्षी भारतात सामान्य मान्सून येण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतात 2005-08 आणि 2010-13 मध्ये सामान्य मान्सून बरसला होता.

"नजीकच्या काळात भारतात सामान्य मान्सून दिसू शकतो. कारण सामान्यपेक्षा कमी पावसाचे दशक संपणार आहे. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्याची घोषणा करताना आयएमडीने केलेल्या घाईवरून झालेल्या टीकेबद्दल बोलताना महापात्रा म्हणाले, हवामान कार्यालयाने मान्सूनची सुरुवात आणि प्रगती जाहीर करण्यासाठी वैज्ञानिक प्रक्रियेचे अनुसरण केले. केरळमधील 70 टक्के हवामान केंद्रांनी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद केली आहे आणि पश्चिमेकडील मजबूत वारे आणि प्रदेशात ढग निर्मितीशी संबंधित इतर निकषांची पूर्तता केली आहे."

महापात्रा म्हणाले, सध्याची 'ला नीना' परिस्थिती ऑगस्टपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे आणि भारतात मान्सूनच्या पावसासाठी चांगली आशा आहे. 'ला निया' परिस्थिती विषुववृत्तीय पॅसिफिकच्या थंडीचा संदर्भ देते. त्यामुळे नकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव विकसित होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे केरळसह नैऋत्य द्वीपकल्पात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागात जूनमधील कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

चालू मान्सून हंगामासाठी अद्ययावत दीर्घकालीन अंदाज जारी करताना महापात्रा म्हणाले, "देशाच्या बहुतांश भागात चांगला पाऊस पडेल. 106 टक्के पाऊस यंदा अपेक्षित आहे, तर उत्तर-पूर्व भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. IMD ने 29 मे रोजी जाहीर केले होते की नैऋत्य मान्सून 1 जून रोजी नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी रविवारी केरळमध्ये पोहोचला आहे.

from india https://ift.tt/YD3Vsxd
https://ift.tt/nJosS3q

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.