Type Here to Get Search Results !

भारतीय तटरक्षक दल आणि डीआरआयची मोठी कारवाई,  1,526 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

Indian Coast Guard : समुद्रात ड्रग्जची (Drugs) आणखी एक मोठी खेप डीआरआयच्या मदतीने तटरक्षक दलाने जप्त केली आहे. DRI आणि भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीपजवळील समुद्रात ऑपरेशन खोजबीन अंतर्गत 1526 कोटी किमतीचे 219 किलो हेरॉईन जप्त केले आहे. गेल्या वर्षभरात डीआरआयने तस्करीसाठी समुद्रात आणले जाणारे सुमारे 25 हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी DRI म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाला गुप्त माहिती मिळाली होती की, लक्षद्वीपजवळील समुद्रात ड्रग्जची मोठी खेप भारताच्या सीमेवर पोहोचणार आहे.

मिळालेल्या माहितीवरून डीआरआयने भारतीय तटरक्षक दलाची मदत घेतली. ICGS सुजित या कोस्ट गार्ड जहाजावर DRI अधिकारी तैनात करण्यात आले होते आणि तेव्हापासून अरबी समुद्रात पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली होती. 18 मे रोजी डीआरआयने तटरक्षक दलाच्या मदतीने प्रिन्स आणि लिटल-जिसस या दोन संशयास्पद बोटींची झडती घेतली. यावेळी जहाजात प्रत्येकी एक किलोची 219 पाकिटे सापडली. ही सर्व पाकिटे अवैध हेरॉईनने भरलेली होती. चौकशीत दोन्ही बोटींच्या कर्मचाऱ्यांनी ड्रग्जची ही खेप समुद्रातच मिळाल्याचे सांगितले. ड्रग्ज मिळाल्यानंतर डीआरआय आणि तटरक्षक दलाने बोटी कोचीला आणल्या आहेत. हेरॉईनची ही खेप कुठून आली आणि ती भारतात कुठे पाठवली जाणार होती, याचा शोध घेण्यासाठी DRI अटक केलेल्या क्रू मेंबर्सची चौकशी करत आहे.

गेल्या वर्षभरात 3800 किलो ड्रग्ज जप्त
डीआरआयच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल 2022 पासून भारतात पकडण्यात आलेली ही अंमली पदार्थांची चौथी मोठी खेप आहे.  एप्रिल 2021 पासून आतापर्यंत देशाच्या सागरी सीमेवरून विविध विमानतळांवर 3800 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या पकडलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 26 हजार कोटी आहे. त्याचबरोबर, तटरक्षक दलाने गेल्या तीन वर्षांत समुद्रात वेगवेगळ्या कारवाईत सुमारे तीन टन अंमली पदार्थ जप्त केले आहेत, ज्याची किंमत सुमारे 12,206 कोटी आहे.

गेल्या वर्षभरात सागरी सीमेवरून वेगवेगळ्या विमानतळांवर पकडले ड्रग्ज

10 मे 2022 : दिल्ली कार्गो विमानतळावर 62 किलो हेरॉईन जप्त.

20 एप्रिल 2022  : कांडला बंदर (गुजरात) येथे 20.6 किलो जिप्सम पावडर जप्त.

29 एप्रिल 2022  : पिपाव बंदर (गुजरात) येथे 396 किलो हेरॉईन पकडले.

सप्टेंबर 2021 : गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 3000 किलो हेरॉईन जप्त.

जुलै 2021 :  न्हावा शेवा बंदरातून 293 किलो हेरॉईन जप्त.

एप्रिल 2021 : तुतिकोरिन बंदरातून 303 किलो कोकेन जप्त करण्यात आले (

फेब्रुवारी 2021 : दिल्लीच्या तुघलकाबाद येथून 34 किलो हेरॉईन.

from india https://ift.tt/WCBzZDX
https://ift.tt/2nGB01f

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.