मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

मनसे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही आरतीचे आयोजन

हनुमान जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यातील खालकर मारुती चौकात महाआरती होणार आहे. तर शिवसेना आज दादरच्या गोल मंदिरात हनुमानाची आरती करणार आहे. राष्ट्रवादीकडूनही आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आज पुण्यात राजगर्जना होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पुण्यातील हनुमान मंदिरात आरती करणार आहेत. अपक्ष खासदार नवनीत राणा आज सकाळी 9 वाजता अमरावतीत हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करून हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत.

ग्राहकांच्या खिशाला कात्री! गोकुळची दूध दरवाढ
शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळनं दूध विक्री किंमतीत चार रुपयांची वाढ केली. हे दर 16 एप्रिलपासून म्हणजेच (15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून) लागू होणार आहेत.

पंतप्रधान मोदी 108 फूट उंच हनुमान मूर्तीचे करणार अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी गुजरतमध्ये हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. शनिवारी पंतप्रधान सकाळी 11 वाजता गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमानाच्या मूर्तीचे नरेंद्र मोदी अनावरण करतील.

मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात ही मूर्ती बसवण्यात येणार आहे.देशभरात भगवान हनुमानाचा चार धाम प्रकल्प उभारला जात आहे. संपूर्ण देशात स्थापित होणारी ही दुसरी मूर्ती आहे. 2010 मध्ये शिमल्यात पहिली मूर्ती बसवण्यात आली होती. तसेच दक्षिणेतील रामेश्वरममध्ये अशीच एक मूर्ती उभारण्यात येणार असून त्याचे काम सुरू आहे.

आयपीएलमध्ये आज डबल धमाका
आयपीएलमध्ये शनिवारी दोन सामने होणार आहेत. दुपारी मुंबईचा सामना लखनौविरोधात होणार आहे. तर रात्री दिल्ली आरसीबीबरोबर दोन हात करणार आहे. मुंबईला सलग पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. शनिवारी मुंबई लखनौविरोधात विजय मिळवत आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. तर दिल्ली आणि आरसीबीमध्ये रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि लखनौ यांच्यातील सामना ब्रेबॉन स्टेडिअमवर होणार आहे. तर आरसीबी आणि दिल्ली वानखेडे स्टेडिअमवर दोन हात करणार आहेत.

आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज आज हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीतील भव्य शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.

हिंदूंवरील हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय कटाबाबत विहिंपचे सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन आज पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघासह देशातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

पंजाबमध्ये आज 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली जाऊ शकते. राज्यातील भगवंत मान सरकारला आज एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबच्या जनतेसाठी आज मोठी घोषणा होऊ शकते. मान सरकारने महिनाभरात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

गाझियाबाद : कॅनडातील टोरंटो येथे झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या कार्तिक वासुदेव या 21 वर्षीय विद्यार्थ्याचे पार्थिव आज दिल्लीत दाखल होणार आहे. कार्तिक हा उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी असून तो जानेवारी महिन्यात कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेला होता. सेंट जेम्स टाऊनमधील शेरबोर्न टीटीसी स्टेशनच्या ग्लेन रोड प्रवेशद्वारावर गुरुवारी संध्याकाळी कार्तिकची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

पाकिस्तानच्या संसदेच्या अध्यक्षाची आज निवड होणार आहे. उपसभापतींविरोधातील अविश्वास प्रस्तावावरही आज मतदान होणार आहे.

मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली ट्रेन आजच्या दिवशी धावली आहे. 16 एप्रिल 1853 रोजी देशात ही पहिली ट्रेन धावली आहे.

from india https://ift.tt/f9FSPQ0
https://ift.tt/tyxmH5P
Today's Top News : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
April 15, 2022
0