मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

आज मध्यरात्रीपासून मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढत आहेत

इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा नव्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. कारण मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार सीएनजी प्रति किलो ५ रुपयांनी, तर घरगुती पाईप अर्थात PNG साडेचार रुपयांनी महागलाय. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत

गुणरत्न सदावर्तेंची पोलीस कोठडी संपणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची कोठडी संपणार आहे. आज गिरगाव न्यायालयात हजर करणार आहेत.

सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या, EOW कडून समन्स

भाजप नेते किरीट सोमय्या (BJP) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमय्या पिता- पुत्रांना आर्थिक गुन्हे शाखेकडून हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे. हजर न राहिल्यास पोलीस किरीट सोमय्या यांना फरार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या 'XE' विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची तज्ज्ञांसोबत बैठक

कोविड-19 प्रकारात ओमायक्रॉन व्हेरीयंट अनेक नवीन प्रकारांना जन्म देत आहे. X व्हेरीयंट आणि XE व्हेरायंटसारखी उदाहरणे समोर आहेत. असे अनेक व्हेरीयंट पुढे देखील येणार असल्याची माहिती केंद्रीय टास्कफोर्सकडून देण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात घाबरण्यासारखे काही नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मनसुख मांडविया यांची तज्ज्ञांसोबत बैठक होणार आहे

मुलींच्या लग्नासाठीची किमान वयोमर्यादा 18 वरून वाढवून 21 करण्याचा प्रस्ताव संसेदेच्या स्थायी समितील पाठवण्यात आला. खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीसमोर हा विषय चर्चेत येणार असून त्यावर लोकांची मतेही मागवण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला, 16 जण जखमी

अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन मेट्रो स्टेशनवर गोळीबाराची घटना घडलीय. या गोळीबारात 16 जण जखमी झाल्याचं सांगितलं जातंय. यापैकी दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या व्यक्तीनं बांधकाम कामगारासारखे कपडे घातले होते आणि तोंडावर गॅस मास्कही लावला होता. त्याच्या हातात गन होती आणि तो काही बॉम्ब घेऊन स्टेशनमध्ये घुसला होता. गोळीबारानंतर पोलिसांनी स्टेशनवर सर्च ऑपरेशन करण्यात आलंय. त्यात काही बॉम्बही सापडले. न्यूयॉर्क पोलीस विभागाची कमांडो टीम मेट्रो स्टेशनमध्ये तैनात करण्यात आलीय. एफबीआयची टीमही घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी चौकशी सुरु केलीय.

रक्षामंत्री राजनाथ सिंह इंडो पॅसफिक कमांड सेंटर दौऱ्यावर

रक्षामंत्री राजनाथ सिंह इंडो पॅसफिक कमांड सेंटर दौऱ्यावर आहेत.

पाकिस्तानमधील सत्ता परिवर्तनानंतर पेशावारमध्ये इमरान खान यांची रॅली

इमरान खानने सोमवारी ट्वीट करत पेशवारमधील रॅलीचे आयोजन करण्यात आली आहे.

उद्याचा आयपीएलचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

उद्या आयपीएलचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जचा सामना रंगणार आहे.

from india https://ift.tt/1ZXQmki
https://ift.tt/hxviwJH
Today's Top News : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
April 12, 2022
0