Sputnik-V : देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यानंतर पुन्हा लसीकरणावर भर दिला जात आहे. आता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने स्पुतनिक-व्ही लसीबाबत निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये असे म्हटलंय की, कोरोना प्रतिबंधात्मक डोस म्हणून स्पुतनिक-व्ही लस घेतली जाऊ शकते. जाणून घ्या सविस्तर

स्पुतनिक लस घेणार्‍या लोकांमध्ये संभ्रम
आत्तापर्यंत स्पुतनिक लस घेतलेल्या लोकांसाठी तिसऱ्या डोसबाबत संभ्रम होता. कारण कोविन ऍपवर Sputnik for Precaution Dose चा पर्याय दिसत नव्हता. ज्या लोकांनी गेल्या वर्षी स्पुतनिक या रशियन लसीचे दोन्ही डोस घेतले होते. अशा लाखो लोकांना तिसरा डोस घ्यायचा की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. कारण स्पुतनिकच्या दोन डोसमधील फरक 30 दिवसांचा होता, त्यामुळे लोकांनी एका महिन्याच्यानंतर लगेचच दोन्ही डोस पूर्ण केले. परंतु ज्यांनी स्पुतनिकचा पहिला डोस घेतला, त्यांनाच तिसरा डोस म्हणून वापरता येईल. म्हणजेच ज्यांनी स्पुतनिकचे दोन डोस घेतले आहेत त्यांना तिसरा डोस दिला जाऊ शकतो. असे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने म्हटलंय

बूस्टर डोसचे अंतर कमी करण्याबाबत अद्याप निर्णय नाही
या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील फरक कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्वी सांगितले जात होते की बूस्टर डोस घेण्यामधील अंतर कमी केले जाऊ शकते. तसेच 9 महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचा तिसरा डोस घेता येईल, असे निर्देश सरकारने यापूर्वी दिले होते. जे खूप मोठे अंतर होते. ती कमी करण्याची मागणी सर्वच तज्ज्ञांकडून होत होती. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनीही याबाबत सरकारला प्रस्ताव दिला होता. ज्यामध्ये लसीच्या दोन डोसमध्ये 9 महिने ते 6 महिन्यांचा फरक असल्याचे सांगण्यात आले.

from india https://ift.tt/8IXEdAL
https://ift.tt/O0ZrSNP
Sputnik-V : बूस्टर डोस म्हणून देणार Sputnik-V? केंद्र सरकारच्या समितीने काय घेतला निर्णय?
April 30, 2022
0