Niti Aayog Vice Chairman : डॉ. राजीव कुमार यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. डॉक्टर राजीव कुमार यांनी जवळपास पाच वर्ष उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. राजीव कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर डॉ. सुमन के बेरी यांची नीती आयोग उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Niti Aayog Vice Chairman Rajiv Kumar has stepped down )

नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष होते राजीव कुमार
राजीव कुमार नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष होते. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने योजना आयोगाचं नाव बदलून नीती आयोग केले होते. त्यानंतर अरविंद पनगढिया नीती आयोगाचे पहिले उपाध्य राहिले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजीव कुमार यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पनगढिया यांनी राजीमाना दिल्यानंतर एक सप्टेंबर 2017 रोजी राजीव कुमार नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष झाले होते. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. राजीव कुमार याआधी फिक्कीचे महासचिव होते. 1995 ते 2005 पर्यंत त्यांनी आशियाई डेवलपमेंट बँकचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिलं होतं. 1992 ते 1995 दरम्यान ते अर्थ मंत्र्यालयाचे आर्थिक सल्लागार होते. 70 वर्षीय राजीव कुमार यांनी लखनौ विद्यापीठतून अर्थशास्त्रामधून पीएचडी आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातून डीफिल केलेय.

Dr Suman K Bery appointed as Vice-Chairman of the NITI Aayog after Dr Rajiv Kumar stepped down from his post. pic.twitter.com/6vQ9HWUSNJ
— ANI (@ANI) April 22, 2022

कोण आहेत सुमन बेरी?
डॉ. राजीव कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर डॉ. सुमन के बेरी यांची नीती आयोग उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुमन बेरी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. बेरी यांनी जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही काम पाहिलेय. 2001 ते 2011 या कालावधीत डॉ. सुमन के बेरी यांनी दिल्लीमध्ये नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये डायरेक्टर जनरल म्हणून काम पाहिलेय. डॉ. सुमन के बेरी सध्या बेल्जियमची राजधानी ब्रूसेल्समध्ये कार्यरत आहेत. सुमन बेरी यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तर प्रिंसटन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेय.

from india https://ift.tt/NpT6V2W
https://ift.tt/YeMNkPT
Niti Aayog : राजीव कुमार यांचा राजीनामा, सुमन बेरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी वर्णी
April 22, 2022
0