Type Here to Get Search Results !
Jammu Kashmir : पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांचा खात्मा, 17 वर्षीय तरुणाचाही समावेश
पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील वाणी हा 16 एप्रिल रोजी दुपारी  नमाजासाठी बाहेर पडला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होतो. कुटुंबाने त्याला परत येण्याचे आवाहन केले. परंतु, तो दहशतवादी गटात सामील झाला होता.
आयजीपी कश्मीर यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पुलवामा चकमकीत मारला गेलेल्या ​रेहान याने इन्स्पेक्टर परवेझ, एसआय अर्शीद आणि एका मोबाईल शॉपच्या मालकाची हत्या केली होती. त्याच्याविरुद्ध अनेक एफआयआर नोंदवण्यात आले होते.
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पहू भागात रविवारी भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने परिसराची घेराबंदी केली आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. लष्कराने देखील याल प्रत्यूत्तर दिले. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराल यश आले.
दरम्यान, आज सकाळीच कुलगाममधील मिरहमा भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे असून सुलतान पठाण आणि जबिउल्लाह अशी त्यांची नावं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या दहशतवाद्यांकडून दोन एके-47 रायफल, सात एके मॅगझिन आणि नऊ ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती देताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांदा खात्मा करण्यात आला आहे. ठार झालेले दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी असून सुलतान पठाण आणि जबिउल्लाह अशी त्यांची ओळख पटली आहे. हे दहशतवादी 2018 पासून कुलगाम-शोपियान जिल्ह्यातील भागात सक्रिय होते.
महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/xwRh2FI Encounter : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचा कट फसला, दोन दहशतवादी ठार
from india https://ift.tt/oY7vAQ3
https://ift.tt/oCGRaqt
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.