Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक मिरवणुकीत मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी देणाऱ्या महंत बजरंग मुनिदास यांना बुधवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी उत्तर प्रदेशच्या सीतापूर पोलिसांनी बजरंग मुनिदासला अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. उघडपणे द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्या महंतांच्या विरोधात मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन केले होते. घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांनी बजरंग मुनिदासच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यत सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी द्वेषपूर्ण भाषणाचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत बजरंग मुनीदास हे द्वेषपूर्ण भाषण देत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये बजरंग मुनीदास यांनी मुस्लिम महिलांबद्दल अपशब्द वापरले होते. मुस्लीम महिलांनी या द्वेषपूर्ण भाषणावरून महंतांच्या विरोधात धरणे आंदोलन केले. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने 1 आठवड्याच्या आत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

from india https://ift.tt/OP86mqa
https://ift.tt/2YxDHWN
मुस्लिम महिलांना दिली बलात्काराची धमकी, बजरंग मुनिदास यांना अटक
April 13, 2022
0