<p style="text-align: justify;"><strong>Congress Misson 2024: </strong>आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीबाबत पक्षांतर्गत सखोल विचारविनिमय सुरू असून, याच अनुषंगाने पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या नेत्या अंबिका सोनी, पी चिदंबरम, केसी वेणुगोपाल आणि इतर काही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेतली. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचनांवर सखोल चर्चा होत आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की नाही आणि जर त्यांनी तसे केले तर त्यांची पक्षात काय भूमिका असेल याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाऊ शकतो.</p>
from india https://ift.tt/q6D2sBE
https://ift.tt/KYGLC5f
काँग्रेसमध्ये बैठका सुरूच, लवकरच प्रशांत किशोरबाबत होऊ शकतो निर्णय
April 21, 2022
0