Type Here to Get Search Results !
Russia Ukraine War: रशियाने भारतासाठी सहा तास युद्ध थांबवलं नाही, त्या बातम्या चुकीच्या; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली: युक्रेनमधील खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीय भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवल्याची बातमी देशातील प्रमुख वाहिन्या आणि वृत्तपत्रात झळकली होती. आता यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. यासंबंधी प्रसारित झालेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, या संबंधी ज्या काही बातम्या प्रसारित झाल्या त्या चुकीच्या आहेत. केवळ रशियाच नव्हे तर युक्रेननेही भारतीय नागरिक सुरक्षितपणे बाहेर पडावेत, आजूबाजूच्या सीमांवर पोहोचावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.
— Nitin A. Gokhale (@nitingokhale) March 3, 2022
पंतप्रधान मोदींची पुतिन यांच्याशी चर्चा
बुधवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा युक्रेनच्या सैन्याकडून सुरक्षा ढालीसारखा वापर केला जात आहे असं पुतिन म्हणाले. पुतिन यांनी या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं.
भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाने सहा तास युद्धबंदीची घोषणा केली आहे. या दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशिया सैन्याकडून एक कॉरिडॉर करण्यात येणार असल्याचंही पुतिन यांनी सांगितलं.
युक्रेनच्या खारकिव्हमध्ये अजूनही हजारो विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर येत आहे. काही भारतीयांनी सांगितलं की, युक्रेनच्या सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर पडू दिलं जात नाही.
दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांनी बाहेर जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला तर गोळ्या घातल्या जातील, अशी धमकी देत भारतीय महिलांना युक्रेनमध्ये मारहाण करण्यात आल्याचा दावा एका विद्यार्थीनीने केला आहे.
संबंधित बातम्या:
<a href="https://ift.tt/oZ9s8dw Ukraine War : ट्रेनमध्ये चढलात तर गोळ्या घातल्या जातील, युक्रेन नागरिकांकडून धमकावल्याचा भारतीय विद्यार्थिनीचा दावा
<a href="https://ift.tt/opMFBGc Crisis : पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी 'आशेचा पूल', पियुष गोयल यांच्याकडून OperationGanga चे कौतुक
पुतिन यांना युद्ध थांबवण्याचा आदेश देऊ शकत नाही, केंद्रानेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करावी; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
from india https://ift.tt/KVt1kdE
https://ift.tt/Zq3aDUh
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.