Pariksha Pe Charcha 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 'परीक्षा पे चर्चा'चा हा पाचवा कार्यक्रम असेल. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या सुमारे एक हजार मुलांना संबोधित करतील. सकाळी 11 वाजता कार्यक्रम सुरू होईल. कोरोनामुळे गेल्या वर्षी हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला होता.

देशभरातील हजार विद्यार्थी होणार सहभागी

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. परीक्षा पे चर्चाचा हा पाचवा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमामध्ये इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे 1 हजार विद्यार्थी सहभागी होतील. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील सरकारी आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.

कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था
यावेळी भारताचे सर्व राज्यपाल राजभवनात विद्यार्थी आणि शिक्षक 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्थांमध्येही हा कार्यक्रम आयोजित केला जाईल.

2018 साली 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाला सुरुवात

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाला 2018 साली सुरुवात झाली. बोर्डाच्या परीक्षेआधी पंतप्रधान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना तणावमुक्त करण्याबाबत चर्चा करतात. कोरोनामुळे गेली दोन वर्ष हा कार्यक्रम ऑनलाईन झाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/QjBlyE5 Restrictions : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही

<a href="https://ift.tt/fKjnPpb एप्रिलपासून बँकेचे नियम बदलणार, औषधं महागणार, जीएसटीतही बदल; जाणून घ्या काय आहेत 10 मोठे बदल

<a href="https://ift.tt/4YqJS61 Drugs Case : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीला दिलासा, आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

from india https://ift.tt/eQzAJIG
https://ift.tt/lKhV5AN
PM Modi : 'परीक्षा पे चर्चा', पंतप्रधान मोदी साधणार 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद, परीक्षेच्या काळात तणावमुक्त होण्यावर चर्चा
March 31, 2022
0