Goa : गोव्यात भाजप उद्या आपला विधिमंडळ नेता निवडणार आहे. गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली आहे. यासाठी उद्या भाजपचे केंद्रीय निरिक्षक गोव्यात येणार आहेत. दरम्यान विधिमंडळ नेता उद्या निवडण्यात येणार असला तरी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कधी होणार याबाबत अद्यप माहिती मिळालेली नाही.

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. निकालानंतर जवळपास 10 दिवसांचा कालावधी लोटला आहे. दहा दिवसानंतर विधिमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला येणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. परंतु, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाले नाही.

सोमवारी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, एल. मुरुगण, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी. टी. रवी गोव्यात दाखल होणार असून या सर्व नेत्यांची महत्वाची बैठक उद्या संध्याकाळी पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. दिल्लीमध्ये देखील घडामोडींना वेग आला असून भाजप नेते विश्वजीत राणे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली होती.यावेळी आगामी मुख्यमंत्री कोण? यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

गोव्यात मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा सुरू आहे. अद्याप कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही.परंतु, गोव्यातील राजकीय चर्चा आणि प्रमोद सावंत यांची दिल्लीवारीवरून त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी विश्वजीत राणे यांनाी राज्यपालांची घेतलेली भेट होती. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी पाहता राणे देखील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/2rQRdyj Cm Candidate : मुख्यमंत्री पदासाठी बंड? गोव्यात आता भाजप विरुद्ध भाजप सामना रंगणार

<a href="https://ift.tt/XipSbqk Raut on BJP : गोवा जिंकलं म्हणून स्वागत झालं, ढोल वाजवले, पण... : संजय राऊत

from india https://ift.tt/wJ6LOKy
https://ift.tt/brQxvMs
Goa : गोव्यात उद्या भाजपचा विधिमंड नेता निवडणार ; सदानंद तानावडे यांची माहिती
March 20, 2022
0