Cruise Drugs Case : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीला ( NCB ) दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने एनसीबीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखीन 90 दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती एनडीपीएस कोर्टाकडे करण्यात आली होती. न्यायालयाने या मागणीचा विचार करून एनसीबीला 60 दिवसांची मुदत दिली आहे.

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात एसीबीने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 20 आरोपींना अटक केली होती. यातील 18 जण सध्या जामीनावर असून तस्करीच्या आरोपात अटक झालेले दोन परदेशी नागरीक अद्याप जेलमध्येच आहेत.

या प्रकरणातील आरोपी मुनमुन धमेचाचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी सांगितले की, एनसीबीने त्यांच्या अर्जात न्यायालयाला सांगितले की, जामिनावर बाहेर असलेले आरोपी सहकार्य करत नाहीत. शिवाय त्यांचे सोशल मीडिया खात्यांची नावे आणि पासवर्ड शेअर करत नाहीत. त्यांनी काही औषधांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यापैकी 17 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. एनसीबीकडे कोणतेही पुरावे नाहीत, केवळ व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे हे संपूर्ण प्रकरण वाढवण्यात येत आहे.
"एससीबीकडे कोण्याही प्रकारचे पुरावे नसून, गेल्या सहा महिन्यात तपास पूर्ण करता आला नाही तर, आता दोन महिन्यात काय करणार आहेत? यामुळे तुरुंगात असलेल्या आरोपींना जामीन मिळण्यात अडचणी येणार आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया आलिशान क्रूझवर 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

नागालँड, आसाम आणि मणिपूरमधील AFSPA कायद्याच्या प्रभाव क्षेत्रात घट होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी पेटीएमकडून 'आता बुक करा, नंतर पैसे द्या' सुविधा, जाणून घ्या कसा घेता येणार लाभ

from india https://ift.tt/SAlynmY
https://ift.tt/lKhV5AN
Cruise Drugs Case : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीला दिलासा, आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत
March 31, 2022
0