<p>शशी थरूर यांच्या इंग्रजीवरच्या प्रभुत्वाची चर्चा नेहमीच होत असते..पण त्यांच्या प्रभावशाली इंग्रजी भाषेतली चूक निदर्शनास आणून दिलीये दस्तुरखुद्द केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी.. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू असलेल्या चर्चेवरून शशी थरूर यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर टिप्पणी करत ट्वीट केलं.. मात्र रामदास आठवलेंनी हेच ट्वीट रीट्वीट करत त्याला प्रत्युत्तर दिलंच आणि त्यातल्या इंग्रजीच्या चुकाही शोधून शशी थरूर यांच्या लक्षात आणून दिल्या. आता गप्प बसतील ते शशी थरूर कसले, त्यांनीही निष्काळजीपणे टाईप करणे हे वाईट इंग्रजीपेक्षा वाईट असं म्हणत आठवलेंना प्रतिटोला लगावला... खरंतर शशी थरूर यांना त्यांच्या इंग्रजीवरून थेट चॅलेंज सहसा कुणी देत नाहीत मात्र रामदास आठवलेंनी काढलेला हा चिमटा राजकीय विश्वासह नेटकऱ्यांमध्येही चवीनं चर्चिला जातोय. </p>
from india https://ift.tt/HAFa92z
https://ift.tt/t4nY2pl
Ramdas Athavle vs Shashi Tharoor: थरुर -आठवलेंमध्ये ट्विटरवॉर ABP Majha
February 11, 2022
0