Type Here to Get Search Results !

Lakhimpur Kheri Case: लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील आशिष मिश्राच्या सुटकेचा मार्ग मोकळा,  न्यायालयाने जामीन आदेशात केल्या सुधारणा

Lakhimpur Kheri Case : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथील चार शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने सोमवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा अटकेत असलेला  मुलगा आशिष मिश्रा याच्या जामीन आदेशात बदल केला आहे. त्यामुळे आशिष याचा तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या आदेशातील उल्लेखातून काही कलमे वगळण्यात आली होती. त्यामुळे आशिषच्या सुटकेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. 10 फेब्रुवारी रोजी त्याला जामीन मंजूर झाला होता.

न्यायमुर्ती राजीव सिहं यांच्या खंडपीठाने आशिष मिश्राकडून दाखल करण्यात आलेल्या सुधारित अर्जावर सुनावणी केली. आशिष मिश्राकडून दाखल केलेल्या सुधारित अर्जात म्हटले होते की, जामीन आदेशात कलम 302 आणि 120 बीचा उल्लेख पाहिजे होता. कारण न्यायालयाने सर्व कलमांचे गुन्हे लक्षात घेऊन जामीन अर्जावर सुनावणी केली होती. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी जामीन अर्ज मंजूर केला होता. परंतु काही कलमे चुकून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आदेशात सुधारणा करून वगळण्यात आलेल्या कलमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय आशिष याची तुरुंगातून सुटका होणे शक्य होणार नाही.

आशिष मिश्रा याच्याकडून दाखल करण्यात आलेल्या सुधारित अर्जावर उच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणी केली. यावेळी नव्या आदेशात कमल 302 व 120 बीचा उल्लेख करण्याचे आदेश दिले.

आशिष मिश्रावर लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया गावात मागील वर्षी तीन ऑक्टोबर रोजी आंदोलक शेतकऱ्यांना कारखाली चिरडल्याचा आरोप आहे. हे शेतकरी तीन कृषी कायद्यांचा विरोध करत होते. आशिष मिश्रा आणि त्याच्या  साथीदारांवर चार शेतकऱ्यांना थार जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत.

महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/uVMi8xS Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी 5000 पानांची चार्जशीट दाखल; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा मुख्य आरोपी

<a href="https://ift.tt/kFAS7TR Case Update : लखीमपूर प्रकरणी मंत्र्याच्या मुलासह उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, न्यायालयात याचिका दाखल

<a href="https://ift.tt/MVXDloJ : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंद विरोधात ज्युलिओ रिबेरो यांची याचिका, नुकसान भरपाई देण्याची विनंती

from india https://ift.tt/5vu7w1C
https://ift.tt/XonDdbU

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.