Hijab Controversy : कर्नाटकात सुरू झालेला हिजाब वाद आता देशभर पोहोचला आहे. काही जण हिजाबचे समर्थन करत आहेत, तर काही जण हिजाबला विरोध करत आहेत. हा वाद सुरू असतानाच आता, हिजाब हा मुस्लिमांचा घटनात्मक अधिकार असल्याचे एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबच्या मुद्यावरुन यापूर्वीही मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी हिजाबचे समर्थन करत हिजाब घातलेली महिला ही एक दिवस देशाची पंतप्रधान असेल, असे वक्तव्य ओवेसी यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी म्हटलं आहे की, हिजाब हा मुस्लिमांचा घटनात्मक अधिकार असून हिंदूंनीही भगवी शाल घालावी, त्यांना कोणी रोखले आहे?

असदुद्दीन ओवेसी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये एका सभेला संबोधित करताना हिजाब मुस्लिमांचा घटनात्मक अधिकार असल्याचे म्हटले आहे. हिजाबवरून सुरू असलेल्या वादावरून ओवेसी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला. ओवेसी म्हणाले, "अखिलेश हिजाबवर बोलायला घाबरत आहेत. त्यांनी अनेक मुस्लिम नेत्यांची तिकिटे कापली आहेत. त्यांना मुस्लिमांची पर्वा नाही."

ओवेसी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केले. ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदी म्हणतात की, मुस्लिम महिला त्यांना आशीर्वाद देत आहेत, परंतु, ते आमच्या बहिणी आणि मुलींकडून हिजाब घालण्याचा अधिकार हिरावून घेत आहेत."

काय आहे हिजाब वाद?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान करण्याच्या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला. या मुद्यावरुन सध्या देशात वादंग निर्माण झाले आहे. याचे देशात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/vL31yzt Controversy : हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी, वकील म्हणाले - मुस्लिम विद्यार्थीनींसोबत धर्मामुळे भेदभाव

<a href="https://ift.tt/aGiZpd5 Controversy: हिजाब घातलेली महिला एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, हिजाबवरुन ओवेसी यांचे मोठं वक्तव्य

<a href="https://ift.tt/n61QFsJ Pogba On Hijab Controversy: हिजाब प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद; फ्रेंचचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाचं ट्वीट चर्चेत, म्हणाला...

from india https://ift.tt/MZXIeVG
https://ift.tt/Ujxtz3f
Hijab Controversy : हिजाब हा मुस्लिमांचा घटनात्मक अधिकार : असदुद्दीन ओवेसी
February 16, 2022
0