Type Here to Get Search Results !

Election 2022 : यूपीत भाजपसमोर तर पंजाबमध्ये काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान, पाहा 2017 ला नेमकी काय स्थिती होती?

Election 2022 : आजचा दिवस उत्तर प्रदेश आणि पंजाबसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे. तर पंजाबमध्ये सर्वच जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्ता राखण्याचे तर पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता राखण्याचे आव्हान कायम असणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केल आहे. दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत नेमकी परिस्थिती काय होती. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या ते पाहुयात...

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशध्ये 403 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये मतदानाचे पहिले दोन टप्पे पार पडले आहेत. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी मतदान झाले आहे. आज 59 जागांचा तिसरा टप्पा पार पडत आहे. दरम्यान, 2017 चा विचार केला तर उत्तर प्रदेशमधील या 59 जागांपैकी 49 जागा जिंकल्या होत्या तर समाजवादी पार्टीला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला केवळ एकचा जागा जिंकता आली होती. बहुजन समाज पार्टीला एकाही जागेवर विजय मिलवता आला नव्हता.

पंजाबमधील स्थिती

पंजाबमध्ये एकूण विधानसभेच्या 117 जागा आहेत. त्या सर्वच जागांसाठी आज मतदान होणर आहे. 2017 चा विचार केला तर पंजाबमध्ये काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर शिरोमणी अकाली दर आणि भाजप यांच्या युतीला 18 जागा आणि आम आदमी पार्टीला 20 जागा मिळाल्या होत्या. तर 2 जागा या लोक इंसाफ पार्टीला मिलाल्या होत्या. त्यामुळे आता यावेळी सत्ता टिकवण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेसला आम आदमी पार्टी, भाजप, शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार टक्कर दिली आहे. याचबरोबर काँग्रेसमधील अंतर्गत कलह देखील या निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर आला आहे. त्याचा देखील काँग्रेसला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या सर्वच जागांचे निकाल 10 मार्चला लागणार आहेत. आत्तापर्यंत गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्येही दोन टप्पे पार पडले आहेत. आज तिसरा टप्पा होत आहे. पंजामध्येही आज सर्वच जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान जरी आज झाले तरी सत्ता कोण काबीज करणार हे येत्या 10 मार्चलाच ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/rxguwzF 2022: यूपीमध्ये आज मतदानाचा तिसरा टप्पा, तर पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठीही आज होणार मतदान

शिवसेना कोणत्याही धमकीला आणि कारवाईला घाबरत नाही ; एकनाथ शिंदे यांचा नारायण राणे यांना टोला

from india https://ift.tt/ebxSnOG
https://ift.tt/FXHnecp

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.