Pakistan High Commission : भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर अनेक परिवार एकमेकांपासून वेगळे झाले. काही जण पाकिस्तानात गेले तर काही भारतात राहिले. यात जवळच्या नात्यातली अनेक लोकं दुरावली. याच फाळणीत दुरावलेल्या दोन भावांची तब्बल 74 वर्षांनी भेट झाली. 74 वर्षांनंतर हे दोघे भाऊ ज्यावेळी भेटले त्यावेळी दोघे एकमेकांना बिलगून रडू लागले. हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता पाकिस्तान हाय कमीशनने पंजाबमध्ये राहणाऱ्या सीका खान यांना व्हिजा जारी केला आहे.

भारतातील पाकिस्तान हाय कमिशनने या दोन भावांचा फोन ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पाकिस्तान हाय कमिशनने म्हटले आहे की, सीका खान यांना पाकिस्तानात राहणारे त्यांचे भाऊ मोहम्हद सिद्दीकी आणि त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी व्हिजा जारी केला आहे. दोघे भाऊ 1947 साली वेगळे झाले होते. त्यानंतर तब्बल 74 वर्षांनी दोघांची भेट कर्तारपूर कॉरिडॉर येथे झाली.

Today, Pakistan High Commission issues visa to Sika Khan to visit his brother, Muhammed Siddique and other family members in Pakistan. The two brothers separated in 1947 were recently reunited after 74 years at Kartarpur Sahib Corridor. pic.twitter.com/SAmkGmaQKT
— Pakistan High Commission India (@PakinIndia) January 28, 2022

या दोन भावांची भेट झाली कर्तारपूर कॉरिडोरमध्ये. देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं होतं. भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळी लहान बंधू आपल्या परिवारासह भारतातून पाकिस्तानात गेले तर त्यांचे मोठे बंधू भारतात राहिले. आता तब्बल 74 वर्षांनी हे दोन भाऊ पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भारताशी जोडणाऱ्या कर्तारपूर कॉरिडोरमध्ये पुन्हा भेटले. आता 74 वर्षांनी दोघांना एकमेकांबद्दल कशीबशी माहिती मिळाली आणि त्यांची भेट झाली. या भेटीनंतर दोघांनी दोन्ही देशांच्या सरकारांचे आभार मानले आहेत.

भारत-पाकिस्तान फाळणी झाली अन् दोन भाऊ वेगळे झाले; 74 वर्षांनंतर भेटले अन् हमसून हमसून रडले, व्हिडीओ व्हायरल

from india https://ift.tt/3Gc85tz
https://ift.tt/eA8V8J
Kartarpur Corridor : फाळणीत दुरावले....74 वर्षांनी एकमेकांना भेटले! व्हिडीओ पाहून पाकिस्तान हाय कमिशनने जारी केला व्हिजा
January 28, 2022
0