Type Here to Get Search Results !
कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' औषधाचा समावेश नाही : ICMR
Molnupiravir Drug : कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' या औषधाचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना उपचारात 'मोलनुपिरावीर' जास्त फायदेशीर नसल्याचं ICMR ने म्हटलं आहे. ICMR च्या तज्ज्ञांनी सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत मोलनुपिरावीर जास्त फायदेशीर नसल्याचं सांगितलं आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या  (Indian Council of Medical Research) नॅशनल टास्क फोर्स ऑन कोरोना व्हायरस (Coronavirus) ने कोरोना व्हायरस संसर्गाच्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलमध्ये अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीरचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे.
"आम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे की, या औषधासंदर्भात मुख्य सुरक्षा समस्या आहेत. यामुळे गर्भाची विकृती होऊ शकते आणि अनुवांशिक भिन्नतेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्नायूंनाही नुकसान पोहोचू शकते. त्याशिवाय औषध घेतल्यानंतर तीन महिने स्त्री आणि पुरुष दोघांनीही गर्भनिरोधक उपायांचा अवलंब करावा", असा सल्ला आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव (Dr. Balram Bhargava) यांनी दिला होता. तसेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि ब्रिटननेही कोरोना उपचारांमध्ये याचा समावेश केला नसल्याची माहिती भार्गव यांनी दिली होती.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. अशातच आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मोलानुपिरावीर हे अँटीव्हायरल औषध आहे. जे कोरोनाची वाढ होण्यापासून प्रतिबंधित करते. 28 डिसेंबर रोजी, भारताच्या औषध नियामकाकडून अँटी-कोविड टॅब्लेट मोलनुपिरावीरच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली होती. मात्र, आता कोरोना उपचारात मोलानुपिरावीरचा वापर न करण्याचं ICMR ने सांगितलं आहे.
लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी
ओमायक्रॉन आणि डेल्टा प्रकारांमुळं देशात संसर्ग झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढू लागलीय. दरम्यान, लहान मुलांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याचा धोका वाढलाय. बहुतेक लोकांमध्ये ओमायक्रॉनची एक सारखीच लक्षणं पाहायला मिळाली. परंतु, लहान मुलं आणि तरुणांमधील ओमायक्रॉनचे दोन वेगवेगळे लक्षण दिसून येत आहेत. लहान मुंल आणि तरुणांमध्ये दिसणारी ओमायक्रॉनची लक्षणं कोणती आहेत? याबद्दल जाणून घेऊयात.
लहान मुलांमध्ये घसा खवखवणे किंवा जळजळ होणे तसेच सर्दी खोकल्याचा त्रास होतो आणि त्यानंतर ताप येतो, अशी लक्षणे पाहायला मिळाली. बोलू शकणारी मुलं घसा खवखवण्याची तक्रार करतात. मात्र, ज्या मुलांना बोलता येत नाहीत, ते फक्त रडतात. यामुळं पालकांनी आपल्या मुलाच्या रडण्याकडं दुर्लक्ष न करता जवळच्या डॉक्टरांना दाखवणे योग्य ठरेल. दुसरीकडे, तरूणांना घशात जळजळ होते. त्यानंतर सर्दी आणि थंडीसह तीव्र तापाची समस्या जाणवते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
<a href="https://ift.tt/34JUP2j Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून
<a href="https://ift.tt/3JYBnPv Corona Test Guidelines : ...तरच कोरोना चाचणी करा; आयसीएमआरची नवी नियमावली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह
from india https://ift.tt/3HNxUBs
https://ift.tt/eA8V8J
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.