HUL product price hike : कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असताना त्यात महागाईमुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलंय. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांनी आपल्या साबण आणि डिटर्जेंट पावडरच्या दरात वाढ केली आहे. हिंदुस्तान युनिलीवर या कंपनीने (Hindustan Unilever) साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीमध्ये तीन टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. हिंदूस्तान युनिलिवर लिमीटेडच्या व्हील, रिन, सर्फ एक्सल आणि लाइफबॉय या उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ करावी लागत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.

उत्पादन खर्चात वाढ -
उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ करावी लागत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यानं कंपनीनं उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. इनपूट कॉस्टमधील वाढीमुळे कंपनीने गतवर्षी देखील अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. आता पुन्हा एकदा वाढ केली आहे.

कोणता प्रॉडक्ट किती महागला?
Rin Bar - 10 ते 20 टक्के
Lifebuoy 125 GMS - 29 ते 31 टक्के
Pears 125GMS - 76 ते 83 टक्के
Wheel Powder 1KG - 60 ते 62 टक्के

Surf Excel ही महागले -
FMCG कंपनीने सांगितले की, सर्फ एक्सल साबणाच्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. सर्फ एक्सल साबणाच्या किंमतीमध्ये 20 टक्केंची वाढ करण्यात आल्याचे कंपनीने सांगितलेय. त्यामुळे आधीच्या किंमतीपेक्षा दोन रुपयांपर्यंत सर्फ एक्सल साबणाची किंमत वाढलेली असेल. म्हणजेच दहा रुपयांना मिळणारे सर्फ एक्सल साबण आता 12 रुपयांना मिळेल.

पियर्स सात रुपयांनी महागले -
HUL ने पियर्स साबणांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. 125 ग्रॅम वजणाच्या पियर्स साबणाची किंमत आता 83 रुपये इतकी झाली आहे. याआधी हे साबण 76 रुपयांना मिळत होते. त्याशिवाय लाइफबॉयचे साबण 29 रुपयांवरुन 31 रुपये इतके झाले आहे.

from india https://ift.tt/34HIhbC
https://ift.tt/eA8V8J
HUL Product : सर्वसामान्यांना महागाईचा फटका! साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ
January 14, 2022
0