Type Here to Get Search Results !

योगी आदित्यनाथांचं ठरलं, या वेळी 'जय श्रीराम'! मथुरा नाही आयोध्येतून निवडणूक लढवणार

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मथुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होत असताना आता नवीनच बातमी येत आहे. योगी आदित्यनाथ आता मथुरा नव्हे तर आयोध्येतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्या माध्यमातून संपूर्ण राज्यात भाजपकडून हिदुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या आधी योगी आदित्यनाथ हे मथुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. भाजपचे खासदार हरनाथ यादव यांनीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वप्नामध्ये आले होते आणि त्यांनी योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं.

आयोध्यातून निवडणूक लढवणार
काशी, मथुरा आणि आयोध्या या मतदारसंघाबाबत भाजप अधिक उत्साहीत असून निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आयोध्येत राम मंदिराची निर्मिती होत असून त्यामुळे समस्त हिंदू संघटनांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला आहे. मथुरेतही सरकारने अनेक प्रोजेक्ट सुरु केले आहेत.

योगी आदित्यनाथ यांचं गोरखपूर मतदारसंघाशी असलेलं नातं लक्षात घेता त्या ठिकाणी भाजप मजबुत स्थितीत आहे. परंतु आयोध्येला जे महत्व आहे ते इतर कोणत्याही ठिकाणाला नसल्याचं मत भाजपचे वरिष्ठ नेते खासगीत बोलताना सांगतात. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी आयोध्येतून निवडणूक लढवली तर त्याचा राज्यभर योग्य तो राजकीय संदेश जाणार असून त्याचा भाजपला मोठा फायदा होणार असल्याची चर्चा पक्षात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/3qlnR0D Assembly Elections 2022: योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी नेमका का दिला राजीनामा?

<a href="https://ift.tt/3HXmPxI Pradesh : निवडणुकीआधीच भाजपला झटका; कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा, समाजवादी पक्षात करणार प्रवेश

<a href="https://ift.tt/3ncaf5B Pawar : पाचपैकी तीन राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार, गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न; शरद पवारांची घोषणा

from india https://ift.tt/33ndqk1
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.