Whatsapp Action on 20 Lakhs Account : जगात सर्वाधिक वापरला जाणारं मेसेज अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप (WhatsApp). भारतात देखील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. व्हॉट्सअॅपने या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 20 लाखापेक्षा अधिक भारतीयांचे खाते निलंबित केले आहे. मेसेजिंग सेवा अॅपने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. आपल्या रिपोर्टमध्ये कंपनी म्हणाली की, आम्ही 20 लाख 69 हजार भारतीयांचे खाते निलंबित केले आहे.

या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले की, भारतीय खात्याची ओळख +91 या क्रमांकाने होती. व्हॉट्स अॅप एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेज मेसेजिंग सेवामध्ये चूकीची भाषा वापरण्यास बंधन घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आयटी नियम 2021 चे पालन करत कंपनीने आपला पाचवा मासिक अहवाल जाहीर केला आहे. अहवाल जारी करताना कंपनीचे प्रवक्ता म्हणाले की, या अहवालात व्हॉट्सअॅपकडे आलेल्या तक्रारी, केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे.

सोशल मीडियातील दिग्गज कंपनी मेटाने ऑक्टोबर महिन्यात भारतातील 1.88 कोटीहून अधिक पोस्टवर कारवाई केली आहे. एकूण 13 श्रेणींमधील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या मासिक अहवालात नमूद केल्याप्रमाणे, फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामने ऑक्टोबर महिन्यात 12 श्रेणीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 30 लाखाहून अधिक पोस्टवर कारवाई केली आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला देशात नवे आयटी कायदा लागू केला आहे. त्या कायद्यान्वये 50 लाखांहून अधिक यूजर्स असलेल्या सोशल मीडिया कंपनीला दर महिन्याला त्यांचा अहवाल प्रकाशित करणं बंधनकारक आहे. या अहवालात त्या कंपनीकडे आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या उपाययोजना यांचीगी माहिती देणं बंधनकारक आहे.

या अहवालात सोशल मीडिया कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आलेल्या पोस्टचीही माहिती देणं आवश्यक आहे. फेसबुकने सप्टेंबर महिन्यात 10 श्रेणीतील नियमांच्या उल्लंघन प्रकरणी एकूण 2.69 कोटीहून अधिक पोस्टवर कारवाई केली होती. तर इन्स्टाग्रामने याच दरम्यान 32 लाखाहून अधिक पोस्टवर कारवाई केली होती.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

संबंधित बातम्या :

<a href="https://ift.tt/3cSZWxW New Features: आता WhatsApp Web च्या मदतीने तयार करा स्वत:चं स्टीकर, अतिशय सोपी आहे प्रक्रिया

व्हॉट्सअॅपच्या अर्जाला मंजुरी; PhonePe, Google Pay ला टक्कर!

<a href="https://ift.tt/30TNYlt WhatsApp Delta : सावधान! तुम्ही 'ही' चूक करताय? तर तुमचंही WhatsApp अकाऊंट होईल ब्लॉक

from india https://ift.tt/3de5YsY
https://ift.tt/eA8V8J
Whatsapp : व्हॉट्सअॅपची मोठी कारवाई, ऑक्टोबर महिन्यात 20 लाखापेक्षा अधिक भारतीयांचे खाते निलंबीत
December 01, 2021
0