नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर (Red Fort) आपला अधिकार असल्याचा दावा करणाऱ्या सुलताना बेगम नावाच्या महिलेला दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारलं आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला हक्क सागणारे गेल्या 170 वर्षांपासून कुठे होते असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने विचारला आहे. सुलतान बेगम या मुघल साम्राज्याच्या शेवटच्या शासकाच्या म्हणजे सम्राट बहादूर शाह जफरची कायदेशीर वंशज असल्याचा दावा करतात.

लाल किल्ल्यावर आपला अधिकार असून 1857 साली ब्रिटिशांनी त्यावर जबरदस्तीने कब्जा केला असल्याचं सुलतान बेगम यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे. न्यायालयाने म्हटलं की, सुलताना बेगमच्या पूर्वजानंनी या आधी लाल किल्ल्यावर आपला हक्क असल्याचा दावा कधीही केला नाही. मग आता न्यायालय या प्रकरणात काही करु शकत नाही. याचिका दाखल करायला इतका उशीर का झाला याचं उत्तर याचिकाकर्त्यीकडे नाही.

सुल्ताना बेगम या मुघल साम्राज्याच्या शेवटच्या शासकाच्या म्हणजे सम्राट बहादूर शाह जफरच्या नातवाच्या, मिर्झा मोहम्मद बदर बख्त यांच्या पत्नी आहेत. 22 मे 1980 रोजी मिर्झा मोहम्मद बदर बख्त यांचं निधन झालं होतं. सध्या त्यांचं वय हे 67 इतकं आहे.

मिर्झा मोहम्मद बदर बख्त यांना 1960 साली मुघल साम्राज्याचा वंशज म्हणून भारत सरकारने मान्यता दिली होती आणि त्यांच्या मृत्यूच्या पश्चात आपल्याला पेन्शन मिळत आहे असं सुलताना बेगम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.

कोर्टाच्या या निर्णयावर सुलतान बेगम म्हणाल्या की, न्यायालयाने मेरिटच्या आधारे यावर विचार न करता केवळ ही याचिका दाखल करायला उशीर झाल्याचं कारण देत ही याचिका रद्दबतल ठरवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

धक्कादायक! दोन वर्षे ना सुनावणी ना जामीन..., महिलेने तुरुंगातच दिला मुलाला जन्म

<a href="https://ift.tt/3J6CVX9 couple Marriage: तेलंगनातील पहिल्या 'गे कपल'चं थाटात लग्न; म्हणाले, 'आम्ही करुन दाखवलं'

आपके बुरे दिन जल्द आएंगे! जय बच्चन राज्यसभेत संतापल्या, सत्ताधाऱ्यांना शाप

from india https://ift.tt/3FhR9Cb
https://ift.tt/eA8V8J
Red Fort : लाल किल्ला तुमच्या मालकीचा, मग याचिकेसाठी 170 वर्षे का लावली? दिल्ली उच्च न्यायालयाचा मुघल वंशजांना सवाल
December 20, 2021
0