<p>रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे आपण अनेकदा सरकारला लाखोल्या वाहतो. पण आता सरकारी अॅपमधूनच खड्ड्यांची माहिती मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं आयआयटी चेन्नईच्या मदतीनं नेव्हिगेशन अॅप लॉन्च केलंय. मॅप माय इंडिया असं या नव्या अॅपचं नाव आहे. या अॅपमधून आता रस्त्यावरचे खड्डे, अपघातप्रवण क्षेत्र, गतीरोधक, धोकादायक वळणं यांची माहिती मिळणार आहे. या अॅपमुळे रस्ते अपघात टाळणे मोठ्या प्रमाणात शक्य होणार आहे. रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत हे अॅप विकसित करण्यात आलंय</p>
from india https://ift.tt/3ErlZr3
https://ift.tt/eA8V8J
Mumbai: खड्डे दाखवणारं 'मॅप इंडिया अॅप', तुमच्या प्रवासात किती खड्डे अॅपवर पहा ABP Majha
December 20, 2021
0