Bharat Biotech Nasal Vaccine : भारत बायोटेकने ड्रग रेग्युलेटरकडे नाकामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. कंपनीने पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांसाठी बूस्टर डोस म्हणून या लसीचा अभ्यास करण्याची परवानगी कंपनीने मागितली आहे. सरकारी सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली.

भारतानं हैदराबादमधील कंपनीद्वारे विकसित करण्यात आलेल्या नाकावाटे देण्यात येणारी लस 'बीबीवी154' च्या वापरासाठी आतापर्यंत मंजुरी दिलेली नाही. यादरम्यान भारतातील औषधी महानियंत्रक (DCGI) कंपनीद्वारे उत्पादित करण्यात येत असलेल्या 'कोवॉक्सिन' लसीचा वापर निर्मितीपासून 12 महिन्यांच्या अवधीपर्यंत करता येऊ शकतो, अशी परवानगी देण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "कंपनीने डीसीजीआयला निवेदन दिलं आहे आणि परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. नाकावाटे देण्यात येणारी ही लस त्या व्यक्तींना देण्यात येईल, ज्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत."

दिल्लीतील एका सरकारी अधिकाऱ्याने कंपनीकडून अर्ज मिळाल्याची पुष्टी केली आणि ते म्हणाले की, भारत बायोटेकने "BBV154" आणि "BBV 152" हे आधीच लसीकरण केलेल्या सहभागींना तिसरा (बूस्टर) डोस म्हणून दिल्यानंतर सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्तीचे मूल्यांकन करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासासाठी परवानगी मागितली आहे.

DCGI ने ऑगस्टमध्ये दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी दिली होती

कोविड -19 विरुद्ध भारत बायोटेकने विकसित केलेली पहिली अनुनासिक (अनुनासिक स्प्रे) लसीच्या (Nasal Vaccine) दुसऱ्या ट्रायलसाठी मंजूर करण्यात आली होती. जैवतंत्रज्ञान विभागाने ही माहिती दिली होती. निवेदनात म्हटले आहे की, चाचणीचा पहिला टप्पा 18 ते 60 वयोगटातील लोकांवर करण्यात आला आहे. इंट्रानासल लस बीबीव्ही 154 आहे, ज्याचे तंत्रज्ञान सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातून भारत बायोटेकने विकत घेतले आहे. ही पहिलीच अशी कोविड - 19 लस आहे जी भारतात मानवांवर क्लिनिकल चाचण्या करेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

ओमायक्रॉन भारतासाठी धोकादायक असल्याचे अद्याप पुरावे नाहीत - INSACOG

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

from india https://ift.tt/3Emnvuw
https://ift.tt/eA8V8J
Bharat Biotech ने मागितली Nasal Vaccine च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी
December 20, 2021
0