Type Here to Get Search Results !

नोकरी सोडल्यानंतरही मिळणार PF आणि पेन्शनचा लाभ, EPFO करत आहे 'हा' बदल

EPFO : कोरोना महामारी अथवा अन्य कारणामुळे नोकरी गेली असेल तरीही पीएफ (PF), पेन्शन (Pension) आणि EDLI याचा लाभ मिळू शकतो. यासाठी EPFO (Employees' Provident Fund Organisation)  एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. EPFO च्या या निर्णायामुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे. ज्यांची नोकरी एखाद्या कारणामुळे गेली असेल अशा लोकांना EPFO च्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

फक्त 500 रुपयांत मिळणार लाभ –
Economic Times च्या एका रिपोर्ट्सनुसार,  ईपीएफओ (Employees' Provident Fund Organisation) त्या लोकांसाठी एक खास योजना आणण्याच्या तयारीत आहे. जे पहिल्यापासून सदस्य आहेत, पण काही कारणांमुळे त्यांची नोकरी गेली. त्यामुळे त्यांना अनौपचारिक क्षेत्रात (Informal Sector) जावं लागलं. हे लोक कमीतकमी 500 रुपये अथवा 12 टक्के इनकम (Monthly Income) देऊन पीएफचा लाभ घेऊ शकतात. या प्रस्तावावर काम सुरु असल्याचं इपीएफओच्या आधिकाऱ्याच्या हवाल्यानं वृत्त देण्यात आलं आहे.

लाखोंना होणार फायदा –
ईपीएफओच्या (Employees' Provident Fund Organisation) मूल्यांकनानुसार, 2018 ते 2020 दरम्यान जवळपास 48 लाख जण ईपीएफओ सब्सक्रिप्शनातून बाहेर गेले आहेत. कोरोना महामारीमुळे ही संख्या अधिक वाढू शकते. जर ईपीएफओचा प्रस्ताव मान्य झाला तर या लाखो लोकांना फायदा मिळू शकतो.

अधिक व्याजासह मिळणार हा फायदा -
या योजनेमुळे सदस्यांना कोणत्याही सेविंग अकाउंट(Saving Account) अथवा अन्य सेविंग योजनापेक्षा (Saving Scheme) जास्त व्याज मिळू शकेल. त्यासोबतच पेन्शन (EPS), पीएफ आणि Employees Deposit Linked Insurance अंतर्गत सात लाखांपर्यंत विमा संरक्षणही मिळेल. 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओचं व्याजदर 8.5 टक्के इतके आहे. हा व्याजदर कोणत्याही सेविंग अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहे. बँक सर्व सेविंग खात्यावर 3.5 टक्के ते 6.25 टक्क्यापर्यंत व्याज देतेय. तर एफडीबाबत (FD) बोलायचं झाल्यास बँक 2.5 टक्के ते 5.75 टक्क्यांपर्यंत व्याज देतेय.

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

from india https://ift.tt/3EckqOi
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.