Parag Agrawal Twitter CEO : ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिलाय. ट्वीट करत याबाबत त्यांनी माहिती दिली. जॅक डोर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले. पराग अग्रवाल आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. 2011 मध्ये पराग यांनी ट्वीटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. फक्त 10 वर्षांत पराग यांची कंपनीच्या सीईओपदी निवड झाली आहे. पराग अग्रवाल यांच्या कामावर जॅक डोर्सी समाधानी होते. त्यांनी अग्रवाल यांचं नाव सीईओ पदासाठी पुढे केल्याचं समजतेय.
2011 पासून पराग अग्रवाल ट्वीटर कंपनीमध्ये Distinguished Software Engineer म्हणून काम सुरु केलं होतं. 2017 मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) या पदावर त्यांची निवड झाली. त्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कंपनीने त्यांची नियुक्ती केली आहे. पराग अग्रवाल लवकरच पदभार स्वीकरणार आहेत. जगभरातील मोठ्या तंत्रज्ञानाविषयक कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव आता या यादीत जोडलं गेलेय.
पराग अग्रवाल यांनी याआधी कुठे केलेय काम –
भारतात जन्मलेल्या पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतली आहे. ट्वीटरशिवाय त्यांनी याहू, माइक्रोसॉफ्ट आणि AT&T यासारख्या दिग्गज कंपनीमध्ये काम केलं आहे.
पराग अग्रवाल यांचं शिक्षण –
पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बे येथून बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण घेतलं आहे.
संपत्ती किती आहे?
पीपलएआयनुसार पराग अग्रवाल यांची एकूण संपत्ती 1.52 मिलिअन डॉलर इतकी आहे.
जॅक डॉर्सींच्या राजीनाम्यानंतर अग्रवाल यांचं ट्वीट -
जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्वीट केलं. आपल्या ट्वीटमध्ये अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असेही आपल्या ट्वीटमध्ये अग्रवाल यांनी म्हटले आहे.
— Parag Agrawal (@paraga) November 29, 2021
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबंधित बातम्या :
<a href="https://ift.tt/3I3CFI1 CEO to Step Down : ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी राजीनामा देण्याची शक्यता
<a href="https://ift.tt/3cWASWZ Update : ट्विटरने आपला 'स्पेस' वाढवला, 600 फॉलोअर्सची मर्यादा हटवली
<a href="https://ift.tt/31akOhJ : 'Twitterच्या तुलनेत बेस्ट आहे कू', Kooचे संस्थापक मयांक बिदावत्कांनी सांगितली कारणं
from india https://ift.tt/3I7zFdy
https://ift.tt/eA8V8J
Parag Agrawal Twitter CEO : आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण, इतकी आहे संपत्ती, जाणून घ्या ट्वीटरच्या नव्या सीईओबद्दल...
November 29, 2021
0