Omicron Variant Guidelines : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं जगाची धाकधूक वाढवली आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण अनेक देशांमध्ये आढळल्यानंतर प्रत्येक देशांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे. अनेक देशांनी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. भारत सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना ज्यांना या व्हेरियंटची लागण झाली आहे त्यांना त्यांच्या स्थानिक वाणिज्य दूतावासांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

1 डिसेंबरपासून विमान वाहतूक मंत्रालयाने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 14 दिवसांचा प्रवास इतिहास देण्याचं बंधनकारक केलं आहे. शिवाय हवाई सुविधा पोर्टलवर नकारात्मक RT-PCR अहवाल तसेच कोविड-19 चाचणी अहवालाची पडताळणी करुन तशी माहिती देणं आवश्यक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना ज्यांना या व्हेरियंटची लागण झाली आहे त्यांना त्यांच्या स्थानिक वाणिज्य दूतावासांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

<a href="https://ift.tt/3dlUZhz Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आवाहन

संसर्गाचा धोका असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारतात येण्यासाठी प्रवास सुरु करण्यापूर्वी 72 तास आधी कोरोना चाचणी करणं अनिर्वाय असणार आहे. तसेच भारतात विमानतळावर दाखल झाल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना क्वॉरंटाइन केलं जाणार आहे. तसेच त्यांच्यावर क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.

<a href="https://ift.tt/3d3ITJt : लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्या मॉल, रेस्टॉरंटमधील व्यक्तींना 10 हजारांचा दंड लागणार; मुंबई पालिकेचा निर्णय

याशिवाय, त्यांचे नमुने संपूर्ण जीनोम सिक्वेंसिंगसाठी दिले जातील. विमानतळावर कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. त्यानंतर भारतात आल्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येईल. त्यानंतर 7 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावं लागणार आहे.

विमान प्रवासासाठी तिकिट बुक करताना विमान कंपन्याना हमी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घ्यावी अशी प्रशासनाने सूचना केली आहे. मागील 15 दिवसांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. विलगीकरणासाठी 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार हॉटेल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थात्मक विलगीकरणाच्या कालावधीनंतरही 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेचे रिचर्डसन अॅन्ड क्रुडास कोविड सेंटर हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता राखीव असणार आहे.

from india https://ift.tt/3daFnwU
https://ift.tt/eA8V8J
Omicron Variant Guidelines : ओमिक्रॉनबद्दल केंद्र सरकारच्या नव्या ट्रॅव्हल गाईडलाईन्स, आजपासून अंमलबजावणी
November 30, 2021
0