Type Here to Get Search Results !

Coronavirus Cases Today : देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट, मात्र धोका कायम; 24 तासांत 805 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Cases Today : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्याचं पाहायला मिळतंय. असं असलं तरी धोका मात्र अद्याप कायम आहे. देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा घटला असला तरी मृतांचा आकडा मात्र अधिक आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 14 हजार 348 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 805 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 57 हजार 191 वर पोहोचली आहे.

देशातील कोरोनाची स्थिती

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 24 तासांत 13 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख 61 हजार 334 सक्रिय रुग्ण आहेत. तर देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 कोटी 42 लाख 46 हजार 157 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 36 लाख 27 हजार 632 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

लसीकरणाचा आकडा 104 कोटी पार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनाचे 74 लाख 33 हजार 392 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर देशात आतापर्यंत 104 कोटी 82 लाख 966 रुग्णांना लस देण्यात आली आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरसचे 12 लाख 84 हजार 552 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर कालपर्यंत एकूण 60 कोटी 57 लाख 82 हजार 957 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1 हजार 418 नवे रुग्ण आढळले, 36 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यातील नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 418 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1 हजार 428 नव्या रुग्णांची नोद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 66 लाख 7 हजार 954 वर पोहचली आहे. यापैकी 64 लाख 45 हजार 454 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 लाख 40 हजार 134 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 97. 54 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात सध्या 1 लाख 71 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर, 896 वैद्यकीय संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याचा तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 4 लाख 74 हजार 928 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9 कोटी 62 लाख 83 हजार 551 लस देण्यात आल्या आहेत. यात पहिला आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे.

from india https://ift.tt/3pROwCf
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.