Type Here to Get Search Results !

Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष लीलाधर हेगडे यांचं निधन

राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष तसंच स्वातंत्र्य शाहीर लीलाधर हेगडे यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. स्वातंत्र्य चळवळ, साने गुरुजींचा पंढरपूर सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्र सेवा दलाचं कलापथक यात त्यांचं मोठं योगदान होतं.

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थ्यांना 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

एसटी कर्मचारी आक्रमक , सांगोला एसटी डेपोला ठोकले टाळे

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठीचे आंदोलन आता अधिक आक्रमक होत असून आज सांगोला एसटी कर्मचाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत आज डेपोला टाळे ठोकले आहे . राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उभी फूट पडल्याचे समोर येत असून कर्मचारी संघटनांनी सरकारसोबत केलेली बैठक कामगारांना मान्य नसल्याने अनेक आगारातील कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावर काम बंद ठेवले आहे .

फटाके फोडताना नऊ वर्षाच्या मुलानं डोळा गमावला

पालकांनो, मुलांच्या हातात फटाके देण्यापूर्वी विचार करा. फटाके फोडताना नऊ वर्षाच्या मुलानं डोळा गमावला.  हिंगोलीच्या गोजेगावमध्ये धक्कादायक घटना घडलीय, एका नऊ वर्षाच्या मुलाने फटाके फोडताना आपला डोळा गमावला.

लासलगावमध्ये एसटी चालकाचा मृत्यू

लासलगाव बसस्थानकासमोरील विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर एसटीला कंटेनरने कट मारल्याने एसटी बसची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाला कंटेनरने धडक देत ओढून नेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संदीप निकम असे मृत चालकाचे नाव असून या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झालाय.

from india https://ift.tt/3Bpf8g8
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.